युवराज-विराटच्या मैत्रीवर योगराज सिंग यांचे वादग्रस्त विधान(फोटो-सोशल मीडिया)
Yograj Singh’s controversial statement on Yuvraj-Virat’s friendship : भारतीय संघाचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान करून भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. योगराज सिंग यांनी अनेक माजी क्रिकेटपटूंना टार्गेट केले आहे. आता योगराज सिंग यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. युवराज सिंग यांच्या वडिलांनी एका मुलाखती दरम्यान आपल्या मुलाच्या मित्रांबाबत बोलले आहेत, ते म्हणाले की, तो सर्वात प्रतिभावान असल्याने सर्वांच त्याच्यापासून घाबरत होते. योगरक सिंग यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कोहली-धोनीसह युवराजच्या संघातील सर्व खेळाडूंना देखील पाठीत वार करणारे म्हटले आहे.
एका चॅनलला मुलाखतीत योगराज सिंग यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, विराट कोहली कर्णधार असताना युवराजसाठी काही करू शकला असता का? २०१७ मध्ये धोनीच्या जागी कोहली एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार झाला होता. तेव्हा युवराजला काही संधी देण्यात आल्या होत्या. तसेच त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघाबाहेर जावे लागले होते. हे सर्व अशा वेळी घडत होते जेव्हा युवराज आणि कोहली यांच्यातील मैत्री चांगलीच रंगू लागली होती.
परंतु, योगराज सिंग यांच्या म्हणणे आहे की, कोहली देखील त्याच्या मुलाचा मित्र वैगरे नव्हता. मुलाखतीमध्ये योगराज युवराज-कोहलीच्या मैत्री आणि त्यातील संबंधाबाबतच्या प्रश्नावर म्हणाले की, “यशाच्या पायरीवर कोणी देखील मित्र नसतात, तुम्ही तेव्हा खूप एकटे असता. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश असते तिथे कोणते देखील मित्र उरत नाहीत. मी युवराजला हे देखील सांगितले होते की, एक मित्र निवडा आणि तो मला द्या.”
योगराज पुढे म्हणाले की, भारतीय संघात इतक्या वर्षात युवराजचा केवळ एकच मित्र सचिन तेंडुलकर होता. युवराजचे वडील म्हणाले, “युवराजचा एकमेव मित्र, जो त्याला आवडतो, तो म्हणजे महान खेळाडू आणि महान माणूस सचिन तेंडुलकर हा आहे, जो युवराजला आपला भाऊ मानत असे. तो एकमेव व्यक्ती आहे जो सर्वांना यशस्वी पाहू इच्छित असतो.”
युवराज सिंगवर त्याच्या खेळातील प्रतिभेची भीती असल्याचा आरोप करण्यासोबतच, योगराज यांनी सर्वांना विश्वासघातकी देखील म्हणण्यास कमी केली नाही. ते पुढे म्हणाले की, “यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या शिडीवर कोणी देखील मित्र नसतात. तेव्हा नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात. नेहमीच असे लोक असतात जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात.”