फोटो सौजन्य - Mumbai Indians
Lucknow Super Giants vs Mumbai Indians : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामधे सामना सुरु आहे, आजच्या सामन्यात लखनौच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे, सलग चार सामने जिंकून संघाचे आता पाचव्या विजयाकडे लक्ष लागले आहे. पहिल्या डावांमध्ये मुंबईने फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्ससमोर 216 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यांमध्ये रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी कमालीची फलंदाजी केली. रिकल्टन याने संघासाठी धमाकेदार सुरुवात करून दिली.
भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने मागील दोन सामन्यात प्रभावित केले होते. पण तो आज विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आज ५ चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने १२ धावा केल्या आणि मयंक यादवने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रायन रिकाल्टन याने संघासाठी अर्धशतक झळकवले. त्याने आज दमदार सुरुवात संघाला करून दिली, आज त्याने ३२ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ६ चौकार मारले. आज तिसऱ्या विकेटसाठी विल जॅकस फलंदाजीसाठी आला होता, यामध्ये त्याने २१ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. तिलक वर्मा आज संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही.
भारताचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने मागील दोन सामन्यात प्रभावित केले होते. पण तो आज विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आज ५ चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने १२ धावा केल्या आणि मयंक यादवने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. रायन रिकाल्टन याने संघासाठी अर्धशतक झळकवले. त्याने आज दमदार सुरुवात संघाला करून दिली, आज त्याने ३२ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ६ चौकार मारले. आज तिसऱ्या विकेटसाठी विल जॅकस फलंदाजीसाठी आला होता, यामध्ये त्याने २१ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. तिलक वर्मा आज संघासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. नमन धीर याने संघासाठी ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले.
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर मयंक यादव याने संघासाठी २ विकेट्स घेतले. प्रिंस यादव याने संघासाठी १ विकेट घेतला. दिग्वेश राठी याने १ विकेट घेतला त्याचबरोबर आवेश खानने देखील संघासाठी 2 विकेट घेतला. तिलक वर्माला बाद करून संघाला १ विकेट मिळवून दिला.