
MI vs RCB, WPL 2026: Nat Sciver-Brunt made history in the WPL; she scored the first century of the tournament.
MI vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने नॅट सायव्हर-ब्रंटच्या ऐसतिहासिक शतकाच्या जोरावर ४ गडी गमावून १९९ धावा केल्या आहेत. आरसीबीला विजय मिळवण्यासाठी २०० धावा कराव्या लागणार आहेत. तथापी. नॅट सायव्हर-ब्रंटने , WPL इतिहासात पहिले शतक ठोकले आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिले शतक ठरले आहे. तिने ५७ चेंडूत १०० धावा पूर्ण करून WPL मध्ये पहिले शतक झळकवण्याचा मान मिळवला आहे.
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येत असेलल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. संघाकडून खेळताना नॅट सायव्हर-ब्रंटने ५७ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या आहेत. तिने या खेळीत १६ चौकार आणि १ षटकार लागवला आहे. या खेळीसह नॅट सायव्हर-ब्रंटने इतिहास रचला आहे, आता ती महिला प्रीमियर लीगमध्ये शतक झळकवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
🚨 𝐌𝐀𝐈𝐃𝐄𝐍 𝐓𝐀𝐓𝐀 𝐖𝐏𝐋 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃 🚨 Natalie Sciver-Brunt creates history 🫡 Take. A. Bow 🙇♀️ Updates ▶️ https://t.co/yUHXkzVIZw #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvMI | @mipaltan pic.twitter.com/V36ZPlBqL9 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 26, 2026
तथापी, मुंबई इंडियन्सची सुरवात चांगली झाली नाही. संघाच्या १६ धावा असताना सजीवन सजना ७ धावा करून बाद झाली. त्यानंतर सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंटने १३१ धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत आणले. हेली मॅथ्यूज ३९ चेंडूत ५६ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली कर्णधार २० धावा करून बाद झाली. तर नॅट सायव्हर-ब्रंट नाबाद १०० आणि अमनजोत कौर ४ धावा काढून नाबाद राहिली. आरसीबईकडून लॉरेन बेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या तर नदिन डी क्लर्क आणि श्रेयंका पाटीलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! Natalie Sciver-Brunt’s historic 💯 helps @mipaltan set @RCBTweets a strong a target of 2⃣0⃣0⃣ 🎯 Scorecard ▶️ https://t.co/yUHXkzVIZw #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvMI pic.twitter.com/NDStk5R5N0 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 26, 2026
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): सजीवन सजना, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), अमेलिया केर, राहिला फिरदौस (डब्ल्यू), अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, वैष्णवी शर्मा, शबनीम इस्माईल, पूनम खेमनार
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नदिन डी क्लर्क, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल