Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक! क्रीडा मंत्री कोकाटे यांच्याकडून सेरेना म्हसकरचे अभिनंदन

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. मुलींच्या संघात कांजूरमार्ग सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 25, 2025 | 06:05 PM
India wins gold medal at Youth Asian Games! Sports Minister Kokate congratulates Serena Mhaskar

India wins gold medal at Youth Asian Games! Sports Minister Kokate congratulates Serena Mhaskar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

१९ ते २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील कांजूरमार्ग येथील स्वराज्य स्पोर्ट्स क्लबची खेळाडू कुमारी सेरेना म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. मुले आणि मुली या दोन्ही भारतीय संघाने या स्पर्धेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावून देशाचा मान उंचावला.

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ कारनामा! सचिन-संगकारा जोडीचा विक्रम केला उद्ध्वस्त

या उत्कृष्ट यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी कुमारी सेरेना म्हसकर हिचे तसेच प्रशिक्षक, पालक व स्वराज्य स्पोर्ट्स क्लबच्या व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “महाराष्ट्रातील तरुण खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी ही राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. शासनाकडून अशा प्रतिभावंत खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

सेरेनाच्या या यशामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून क्रीडाक्षेत्रातील नवोदितांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.अंतिम फेरीत, दोन्ही भारतीय संघ इराणविरुद्ध आमनेसामने आले, परंतु सामने अगदी वेगळ्या शैलीत झाले. मुलांच्या संघाने कठीण संघर्षाचा सामना केला आणि शेवटी ३५-३२ अशा जवळच्या गुणांसह इराणवर विजय मिळवला. याउलट, मुलींच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत इराणचा ७५-२१ असा जबरदस्त पराभव केला.

हेही वाचा : Aus W vs Sa W : अरे काय हे? भारताची लाज घालवली! इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड; आरोपी अटकेत

सिडनीत भारताने ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्सने चालरी धूळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने दमदार विजय मिळवला आणि  मालिकेचा शेवट गोड केला आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी  ४६.४ ओव्हरमेध्ये सर्वबाद २३६ धावांवर रोखले तर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेले २७३ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

Web Title: Minister kokate congratulates serena mhaskar for representing india at the youth asian games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 06:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.