विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli breaks Sachin-Sangakkar’s record : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. पहीले दोन सामने गमावणाऱ्या भारताने जोरदार मुसंडी मारत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. या मालिकेत सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, विराट कोहलीची बॅट सिडनी सामन्यात चांगलीच तळपली. त्याने ८१ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा महान कुमार संगकाराला मागे टाकत मैलाचा दगड गाठला आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : सिडनीत ‘हिटमॅन’ शो! ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे शानदार शतक
विराट कोहलीने सिडनीमध्ये ५५ वा धावा पूर्ण करताच त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित यादीत प्रवेश केला आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याने १४,२३४ धावा करणाऱ्या कुमार संगकाराला पिछाडीवर टाकले आहे, विराटने आता हा विक्रम आपल्या नावे केला आहे. या यादीत त्याच्या पुढे फक्त भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा आहे, ज्याने एकदिवसीय स्वरूपात १८,४२६ धावा करण्याची किमया साधली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीला तो दोन सामन्यांमध्ये खाते उघडू शकला नव्हता, परंतु सिडनीमध्ये त्याने त्याच्या बॅटने त्याला प्रतिसाद दिला आणि उत्कृष्ट धावा करून आपली दहशत दाखवून दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. त्याच्या वेळेनुसार आणि फूटवर्कने प्रेक्षकांना जुन्या कोहलीची पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जेरीस आणले. त्याने आपल्या खेळीत अनेक शानदार स्ट्रोक खेळले. जे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याच्या अर्धशतकामुळे त्याने आपणच किंग आहोत ही दाखवून दिले.
भारताच्या अनुभवी खेळाडू विराट कोहलीने सिडनीच्या या डावात आणखी एक मोठा टप्पा गाठला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाठलाग करताना सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील आता मागे टाकले आहे. आतापर्यंत कोहलीने सचिन तेंडुलकरच्या ६९ च्या तुलनेत ७० वेळा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माकहा क्रमांक लागतो. ज्याने ५५ अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.






