ऑस्ट्रेलियन महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
ICC Womens World Cup 2025 : भारतात सध्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. आज विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा छळ करण्याची बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार दोन्ही खेळाडू हॉटेल रेडिसन ब्लू सोडून एका कॅफेमध्ये जात असताना दुचाकीवरून आलेल्या काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 237 धावांचे लक्ष्य! सिडनीत हर्षित राणाचा ‘चौकार’
पोलिसांनी दाखल केली तक्रार केली
ही घटना खजराना रोडवरील हॉटेल रेडिसन ब्लूजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार अचानक महिला क्रिकेटपटूंकडे जाऊन त्यांच्याकडून क्रिकेटपटूंना अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला. घटनेनंतर लगेचच दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
सिमन्स यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, एफआयआर दाखल केला गेला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अकील असल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : IND vs AUS : तिसऱ्या ODI दरम्यान भारताला झटका! चालू सामन्यात वेदनेने विव्हळला ‘हा’ खेळाडू; सोडवं लागलं मैदान
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अकील खानची ओळख एका नागरिकाच्या अंतर्दृष्टीमुळे झाली. त्याने आरोपीचा बाईक नंबर नोंदवून घेतला. ज्यामुळे पोलिसांना त्याची ओळख पटण्यास मदत झाली आणि त्याला लवकर अटक करण्यात आली. पोलिस सूत्रांनुसार, आरोपीवर पूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इंदूरमध्ये घडलेल्या या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. भारतात इतर देशातील खेळाडूंच्या सुरक्षेयायाबाबत इतकी मोठी चूक कशी होऊ शकते असा प्रश्न आता निर्माण झाला. एकूणच शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना टेबल टॉपवर असलेल्या संघाशी होणार आहे. आज इंदोर येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या निकालावरून २९ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध कोणता संघ खेळेल ही स्पष्ट होईल.






