Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Champions Trophy : ना बुमराह, ना पंत, मोहम्मद कैफने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडून सर्वांना केलं आश्चर्यचकित…

मोहम्मद कैफने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी १५ खेळाडूंचीही निवड केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने ऋषभ पंत किंवा यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केलेली नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2025 | 11:17 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारताचा संघ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज मुंबईत दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. परंतु भारताचा संघ काही कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाणार नाही त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने हे युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळणार हे पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर वानखेडे स्टेडियमवर पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करणार आहेत. याआधी माजी खेळाडू आणि तज्ज्ञ हे सोशल मीडियावर आपआपली मते मांडताना दिसत आहेत. या एपिसोडमध्ये मोहम्मद कैफने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी १५ खेळाडूंचीही निवड केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने ऋषभ पंत किंवा यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे त्रस्त आहे, त्याच्या खेळण्यावर शंका आहे.

U19 Women’s T20 World Cup 2025 : विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार भारतीय संघ, आजपासून स्पर्धेला सुरुवात

मोहम्मद कैफने प्रथम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्लेइंग इलेव्हनची निवड केली. कैफच्या मते, शुभमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करायला हवी. तर विराट कोहली नंबर-३ आणि श्रेयस अय्यर आणि केएल राहुल मधल्या फळीत असू शकतात. कैफने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे तर तीन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. हार्दिक पांड्या आणि नितीश रेड्डी हे वेगवान अष्टपैलू गोलंदाज असतील. त्याने रवींद्र जडेजाची फिरकी गोलंदाजी अष्टपैलू म्हणून निवड केली आहे. कैफ म्हणतो की, परिस्थितीनुसार नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर जागा बदलू शकतात.

दुसरा फिरकीपटू म्हणून त्याने चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला स्थान दिले आहे आणि वेगवान गोलंदाजीत त्याने मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराजला स्थान दिले आहे. कैफच्या बॅकअप खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर वॉशिंग्टन सुंदर व्यतिरिक्त या यादीत संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. मोहम्मद कैफच्या मते या १५ खेळाडूंची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड व्हायला हवी.

चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत यामध्ये सर्व संघानी त्याच्या टीमची घोषणा केली आहे. भारताचा एकमेव संघाने अजुनपर्यत संघाची घोषणा केली नाही. भारतीय संघाच्या सातत्याने खराब कामगिरीमुळे भारतीय संघासाठी आणि टीम इंडियाच्या कमबॅकसाठी ही स्पर्धा महत्वाची असणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांची नजर भारतीय संघाच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीवर असणार आहे.

मोहम्मद कैफने निवडलेला चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल.

 

Web Title: Mohammad kaif surprised everyone by selecting the team for the champions trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • Mohammad Kaif

संबंधित बातम्या

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
1

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
2

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

IND vs ENG : रोहित शर्माला वनडे कर्णधारपदापासून धुवावे लागणार हात! गिल सांभाळणार कमान; माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ
3

IND vs ENG : रोहित शर्माला वनडे कर्णधारपदापासून धुवावे लागणार हात! गिल सांभाळणार कमान; माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ

IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..
4

IND vs ENG : ‘भारताचा विजय होणार, मला याची माहिती..’, संघाच्या विजयाने ‘हा’ माजी ‘दादा’ कर्णधार आनंदी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.