
Oh dear, what times have come! Mohammad Rizwan has brought shame to Pakistan; Melbourne Renegades called him back from the crease; Watch the VIDEO.
Mohammad Rizwan was forced to retire in the BBL : पाकिस्तानचा स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याची मोठी नाचक्की झाली आहे. या लीगमध्ये खेळत असताना मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानास्पद कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद रिझवानला संथ फलंदाजीमुळे निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले.
मोहम्मद रिझवान सध्या बिग बॅश लीग २०२५-२६ मध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे. सोमवारी, सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात, रिझवानला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. रिझवानला क्रीजवरील गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसून आला. त्याने २३ चेंडूंमध्ये २६ धावांच केल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला, तर त्याचा स्ट्राइक रेट फक्त ११३.०४ होता, जो संघाला अपेक्षा होती असा नव्हता.
हेही वाचा : WPL 2026 : गुजरात जायंट्सला मोठा धक्का! ‘ही’ भारतीय स्टार खेळाडू या हंगामातून पडली बाहेर; काय आहे कारण?
तेच्या या खेळीमुळे संघाच्या कर्णधाराने त्याला निवृत्त होण्याचे संकेत दिले. कर्णधाराकडून सिग्नल मिळाल्यानंतर, रिझवान अनिच्छेने डोके टेकवून पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. मेलबर्न रेनेगेड्सला २० षटकांत ८ गडी गमावून १७० धावाच करता आल्या.
मोहम्मद रिझवान हा सध्याच्या काळातील पाकिस्तानच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटपटू आहे. रिझवान बऱ्याच काळापासून टी२० मध्ये त्याच्या स्ट्राईक रेटशी संघर्ष करताना दिसत आहे. यामुळे पाकिस्तानच्या टी२० संघात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.तसेच, २०२६ च्या टी२० विश्वचषकात स्थान मिळवण्याची त्याची शक्यता देखील कमी असल्याची मानली जात आहे. टी२० विश्वचषकासाठी रिझवानला प्राथमिक संघात स्थान देण्यात आलेले नाही.
हंगाम सुरू होण्यापूर्वीच, बीबीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना बरीच प्रसिद्धी मिळाली. बाबर आझम, रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि शादाब खान यांच्याकडून अपेक्षा जास्त व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र या स्पर्धेत आतापर्यंतची त्यांची कामगिरी निराशाजनक अशीच राहिली आहे. शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शादाब खानला परत बोलावण्यात आले आहे आणि हरिस रौफ अजून देखील महागडा ठरत असल्याचे चित्र आहे.
Muhammad Rizwan has been retired out by the Melbourne Renegades 👀 #BBL15 pic.twitter.com/AuTGoTIHqb — KFC Big Bash League (@BBL) January 12, 2026
हेही वाचा : कोणी केली ‘गब्बर’ ची शिकार? ‘हा’ क्रिकेटपटू पुन्हा चढणार बोहल्यावर! वाचा संपूर्ण प्रेमकहाणी
बाबर आझम सिडनी सिक्सर्सकडून खेळत असून तो डावाची सुरुवात करत आहे, परंतु त्याची कामगिरी त्याला साजेशी राहिलेली नाही.बाबरने या हंगामात आठ सामन्यांमध्ये आठ डावांमध्ये केवळ १५४ धावाच केल्या आहेत, यामध्ये त्याने १०४.०५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. रिझवानची सरासरी बाबरपेक्षा देखील कमी आहे. रिझवानने आठ डावांमध्ये २०.८७ च्या सरासरीने आणि १०१.८२ च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या आहेत.