

मोहम्मद कैफने व्यक्त केली नाराजी
मुनाफ, हर्षा भोगलेंचाही आक्षेप
मोहम्मद सध्याचा टेस्टमधील सर्वोत्तम गोलंदाज
Mohammad Siraj : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना ख्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हल मैदानात खेळवला जात आहे. संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली नाही. संघातील मॅनेजमेंटच्या या निर्णयावर भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
माजी भारतीय फलंदाज मोहम्मद कैफ सिराजला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याने नाराज दिसला. त्याने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, विश्वास ठेवणं कठिण आहे, की भारताचा सर्वात वेगवान गोलंदाजांपेकी एक मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा संघा बाहेर ठेवण्यात आले.
सिराजला जसप्रीत बुमराहसोबत भारताच्या परदेशी टेस्ट बॉलिंग अटॅकमध्ये सर्वात आधी निवडले गेले पाहिजे होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, बॉलिंग प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने स्वतः सिराजला वर्ल्ड-क्लास बॉलर वर्तवले होते. तो सध्या चांगली गोलंदाजी देखील करत आहे.
तसेच माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने लिहिले की, पुन्हा एकदा मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. मुनाफने आपल्या आणखीन एका ट्वीटमध्ये सध्याच्या बॉलिंग अटॅकवर प्रश्न उपस्थित केले. त्याने लिहिले की, चला, काहीच गोष्ट नाही, जर आपण मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला जर संघात पाहू शकत नाही, तर आपली पुढील बॉलिंग यूनिट कुठे आहे, जी सामना जिंकण्यास माहिर आहे?
तसेच क्रिकेट विशेषज्ज्ञ आणि कमेंटेटर हर्षा भोगले हे देखील आपल्या एक्स अकाउंटवर सिराजबाबत म्हणाले की, सिराज आता भारताचा सहाव्या क्रमांकावरील वेगवान गोलंदाज आहे. मला हे खूप चुकीचे वाटले. या वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप सायकलमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये टॉप 5 विकेट घेणाऱ्यांमध्ये भारताकडे आता फक्त बुमराहसाठी जागा आहे. आपली जर इच्छा असेल तर बॉलर चांगले निवडण्यात यावेत, त्यांच्याकडे बॉलिंगसाठी सर्वोत्तम कंडीशन आहे, पण त्यांना ठाऊक असेल की, जेव्हा त्यांची वेळ येईल, तेव्हा त्यांना जास्त संधी मिळणार नाही.
मोहम्मद सिराज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC)च्या सध्याच्या सायकलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 43 विकेट आपल्या नावे केले आहेत. सिराजला या वर्षी फक्त 3 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. आणि या काळात त्याने 5 विकेट प्राप्त केले. वर्ष 2020 मध्ये डेब्यू केल्यानंतर ही पहिली वेळ असेल की, जेव्हा सिराज एखाद्या विदेशी कसोटी मालिकेत एकही सामना न खेळता मायदेशी परतला असेल.