फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी बऱ्याच वेळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. मोहम्मद शामीने एकदिवसीय विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांच्या पायाची अमेरिकेमध्ये सर्जरी झाली होती. एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताच्या संघाला अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताच्या संघाने जून महिन्यामध्ये T२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद नावावर केले, मोहम्मद शामी भारतीय संघाचा भाग नव्हता. त्याच्या सर्जरीमुळे तो संघामध्ये बाहेर होता. आता काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की मोहम्मद शामी पुन्हा जखमी झाला आहे. परंतु आता टाईम्स ऑफ इंडियाच्या एका नवीन रिपोर्टने शमी परत न येण्याच्या सर्व अफवा खोट्या सिद्ध केल्या आहेत. १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमी पुनरागमन करू शकतो, असे सांगण्यात आले.
बीसीसीआयच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने म्हटले आहे की, “मोहम्मद शामी लवकरच पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचे पुनरागमन होण्याचीही शक्यता आहे. बीसीसीआयचे तज्ञ त्याच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत. त्याची काळजी घेतली जात आहे. बरे होत आहेत.” यामुळे नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी शमीही टीम इंडियाच्या संघात सामील होऊ शकतो, अशी आशाही वाढली आहे.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्याबद्दल खुद्द शामीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. X वर पोस्ट करताना, त्याने लिहिले की तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळणार नाही याबद्दल त्याच्याकडून किंवा बीसीसीआयकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. शामीने या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शामीने केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये १६ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी अजुनपर्यत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली नाही. भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या दरम्यान खेळवला जाणार आहे.