फोटो सौजन्य - Chennai Super Kings/JioHotstar
एमएस धोनी – सुरेश रैना : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ४३ वा सामना पार पडला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईच्या संघाला आणखी एकदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आहे, कालच्या सामन्यात चेन्नईच्या संघाला हैदराबादने ५ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईच्या संघाने या सिझनची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे, संघ सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. या इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत.
५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या या संघाने १८ व्या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत आणि २ सामने जिंकले आहेत. यलो आर्मी ४ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. संघाच्या कामगिरीसाठी सीएसकेच्या माजी खेळाडूंनी त्यांच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. आयपीएल २०२५ मध्ये संघाच्या अडचणींसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाला माजी सीएसके खेळाडू सुरेश रैनाने जबाबदार धरले आहे.
हार्दिक पांड्यांचा संघ लढणार लखनऊ सुपर जायंट्सशी! वाचा हेड टू हेड रेकॉर्ड
काल सामान्यांच्या वेळी सुरेश रैना व्यवस्थापनाला जबाबदार धरले आणि त्यांच्यावर बोट उचलले आहे. यावेळी तो म्हणाला की चेन्नईच्या लिलावाच्या रणनीतीमध्ये एमएस धोनीचा फारसा सहभाग नव्हता, ज्यामुळे या हंगामात संघ फॉर्ममध्ये नाही. ९ सामान्यांमध्ये चेन्नईच्या संघाने ९ २० खेळाडूंना संधी दिली आहे पण खेळाडूंनी आतापर्यत निराशा केले आहे. विजयी संघाच्या शोधात सीएसकेने आतापर्यंत त्यांच्या २७ पैकी २० खेळाडूंचा वापर केला आहे. शुक्रवारी चेन्नईने डेवाल्ड ब्रेव्हिसला पदार्पणाची संधी दिली. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयुष म्हात्रेला सलामीची संधी देण्यात आली. तथापि, चेन्नईचे नशीब बदलले नाही आणि संघाला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
The curious case of Chennai’s struggles in #TATAIPL! 🧐
With #SRH getting their revenge over #CSK, #SureshRaina breaks down how things went off track right from the auction table.#IPLonJioStar 👉 #KKRvPBKS | 26th APR, SAT, 6:30 PM | LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi &… pic.twitter.com/ZgzLD4h7la
— Star Sports (@StarSportsIndia) April 26, 2025
“काशी सर – मला वाटतं ते जवळजवळ ३० ते ४० वर्षांपासून प्रशासन सांभाळत आहेत. रूपा मॅडम सर्व क्रिकेट प्रशासन सांभाळत आहेत. खेळाडू खरेदी करत आहेत, कोअर ग्रुप राखत आहेत. पण सर्वांना माहिती आहे की यावेळी खरेदी केलेले खेळाडू योग्यरित्या निवडले गेले नाहीत,” असे सुरेश रैना स्टार स्पोर्ट्सवर स्पष्टपणे म्हणाला. पुढे रैना म्हणाला की, “ते नेहमीच म्हणतात की एमएस धोनी अंतिम निर्णय घेतो. पण खरे सांगायचे तर, मी कधीही कोणत्याही लिलावात भाग घेतला नाही. मी कधीही त्या चर्चेचा भाग नव्हतो. मी नेहमीच कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंबद्दल बोललो. खेळाडूला बढती द्यायची की नाही याचा निर्णय एमएसला घ्यायचा असतो – पण तो त्यात सहभागी होत नाही,” रैना म्हणाला.
रैना म्हणाला, “धोनी फक्त ब्रँड, त्याचे नाव आणि चाहत्यांसाठी खेळत आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो विकेटकीपिंग करतोय, कर्णधारपद सांभाळतोय, संपूर्ण संघाची जबाबदारी खांद्यावर घेतोय. इतर दहा खेळाडू काय करत आहेत?”