फोटो सौजन्य - Lucknow Super Giants/Mumbai Indians सोशल मीडिया
Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये वानखेडे मैदानावर २७ एप्रिल रोजी दुपारी सामना खेळवला जाणार आहे. हे दोन्ही संघ आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये टॉप ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईचे फलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. या दोघांची हेड टू हेड आकडेवारी काय आहे यावर एकदा नजर टाका आणि कोणत्या संघाचे पारडे जड यासंदर्भात जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आतापर्यत ७ सामने झाले आहेत. ही आकडेवारी पाहून सर्वानाच धक्का बसेल. यामध्ये पाच वेळा आयपीएल विजेता संघ ६ वेळा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभूत झाला आहे तर १ वेळा मुंबई इंडियन्सचा संघ हा लढतीत जिंकला आहे. या दोघांमध्ये सर्वाधिक धावसंख्या २१४ इतकी आहे तर सर्वात कमी धावसंख्या १९६ इतकी आहे.
रोहित शर्माने LSG च्या तरुण फलंदाजाला असे का म्हटले? ‘तू माझ्यासारखा खेळू शकत नाहीस…’, Video Viral
गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर लखनौ सुपर जायंट्सचा संघ सध्या या शर्यतीत १० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सने ९ सामने खेळले आहे या सीझनमध्ये यामध्ये त्याने ५ सामन्यात विजय मिळाला आहे तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सची संघाची या स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली झाली नाही. पण संघानी दमदार सुरुवात केली आहे, सलग चार सामन्यात विजय मिळवून टॉप चारमध्ये स्थान मिळवले आहे. रोहित शर्मा देखील सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे, मागील दोन सामन्यात धुव्वादार फलंदाजी केली होती.
ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर), निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, आकाश दीप, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, आयुष बडोनी, मोहसीन खान, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, एडन मार्कराम, शमर जोसेफ, एम सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रिएट्झके, युवराज सिंग, युवराज, युवराज, युवराज, अरविंद सिंह चौधरी, आकाश सिंग, राजवर्धन हंगरगेकर, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, रॉबिन मिंज, नमन धीर, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), दीपक चहर, मुजीब उर रहमान, विल जॅक्स, अश्विनी कुमार, रीस टोपले, कृष्णन सृजित, मिचेल राज्वाना, बेवो रजनी, सनेरनू, विल जॅक्स. जेकब्स, लिझाड विल्यम्स, अर्जुन तेंडुलकर, विघ्नेश पुथूर