फोटो सौजन्य - सोशल मीडिया
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या सुरु आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणत्या खेळाडूंना संघामध्ये कायम ठेवणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. यासंदर्भात क्रिकेट प्रेमींना प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक वृत्त आले होते की कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही असे चाहत्यांचे प्रश्न होते या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट झाले आहे. भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला पाच ट्रॉफी जिंकवून देणार महेंद्रसिंह धोनी यंदा इंडियन प्रीमियर लीग आगामी सिझन खेळणार आहे. आता सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण खुद्द माहीने आयपीएलच्या पुढील हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत.
हेदेखील वाचा – AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! कांगारूंचा संघ लढणार पाकिस्तानशी
सर्व फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. असे मानले जाते की CSK यावर्षी धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवेल, ज्यामुळे त्याला संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा होईल. धोनीने आयपीएल २०२४ पूर्वी सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते आणि संघाची कमान रुतुराज गायकवाडकडे सोपवली होती, त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत अटकळ बांधली जात होती. आता धोनीने स्वतः आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. एक खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळत आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे, असे त्याने म्हटले आहे.
पुढे धोनी म्हणाला, माझ्या गेल्या काही वर्षांत जे काही क्रिकेट खेळू शकलो, त्याचा आनंद घ्यायचा आहे. लहानपणी जसा संध्याकाळी चार वाजता बाहेर पडून खेळायचो, तसाच खेळाचा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही हा खेळ व्यावसायिकपणे खेळता तेव्हा कधी कधी त्याचा आनंद घेणे कठीण होते. मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत भावना आणि वचनबद्धता गुंतलेली असते, परंतु मला पुढील काही वर्षे खेळाचा आनंद घ्यायचा आहे.
हेदेखील वाचा – टीम इंडियाचा कोच बदलणार? दक्षिण आफ्रिका दौऱ्यात हा दिग्गज खेळाडू देणार भारतीय संघाला प्रशिक्षण
त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनीही सांगितले होते की, त्यांना आशा आहे की धोनी आगामी हंगामात एक खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल. २०२३ मध्ये डाव्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीने २०२४ च्या आयपीएल हंगामात कमी क्रमाने फलंदाजी केली. भारताच्या माजी कर्णधाराने सांगितले की, हा निर्णय प्रामुख्याने युवा भारतीय खेळाडूंना T20 विश्वचषकापूर्वी मैदानावर वेळ घालवण्याची संधी देण्यासाठी घेण्यात आला आहे. धोनी म्हणाला, माझी विचारसरणी साधी होती, जर इतर लोक त्यांचे काम चांगले करत असतील तर मला उच्च क्रमवारीत येण्याची काय गरज आहे.