फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा संघ : भारताचा संघ आगामी येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये काही महत्वाचे सामने खेळणार आहे. यामध्ये भारताचा संघ ८नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणार आहे तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून होणार आहे. सध्या भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेचा शेवटचा सामना शिल्लक आहे. यामध्ये भारताच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाने 18 वर्षांनंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिका गमावली. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियाला हा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या या धक्कादायक पराभवानंतर आता जी बातमी समोर आली आहे ती धक्कादायक आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – MS Dhoni : कॅप्टन कुलच्या पत्नीने मास्टर माइंड धोनीच्या ज्ञानांवर केले प्रश्न उपस्थित! व्हिडीओ व्हायरल
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया चार सामन्यांच्या T-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये भारताचा संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. एवढेच नव्हे तर या दौऱ्यात गौतम गंभीर नाही तर टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. क्रिकजॅबच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात व्हीव्हीएल लक्ष्मण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
🚨 VVS Laxman to be the head coach for Team India for the T20Is against South Africa pic.twitter.com/jTTjtENQdZ
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 28, 2024
बॉर्डर-गावसकर करंडक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गंभीर टीम इंडियासोबत रवाना होणार आहे. बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लक्ष्णा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्याचे वृत्तात म्हटले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारी चार सामन्यांची टी-20 मालिका अगोदर नियोजित नव्हती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याची व्यवस्था केली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 08 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर मालिकेतील शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ४ नोव्हेंबरपर्यंत दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
दुसरीकडे, 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया 10 किंवा 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकते. अशा स्थितीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियासोबत राहणे शक्य झाले नसते. व्हीव्हीएस लक्ष्मणसह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करणारे उर्वरित कोटिंग कर्मचारी देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत, ज्यात साईराज बहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष यांचा समावेश असू शकतो.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विष्णोई, अविनाश खान, विजयकुमार खान. यश दयाल.