मुंबई : रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये ‘डब्ल्यूपीएल’ची अंतिम लढत पार पडली. (women premier league) यात आर्थिक राजधानी मुंबईनं पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे ऐतिहासिक जेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर लीगमध्ये आपले वर्चस्व गाजवत फायनलचा पल्ला गाठला. दिल्ली संघाने गुणतालिकेमध्ये सर्वाधिक १२ गुणांची कमाई करत थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अंतिम सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत १३२ धावांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष्य मुंबई अगदी सहज म्हणजे तीन विकटे गमावत पार केले. आणि दिल्लीवर सात विकेटसनी विजय मिळवला. पहिल्यावहिल्या महिला प्रिमियर लीग मुंबई दिल्ली काबिज करणार का? की दिल्ली मुंबईला चीतपट करणार याकड़े क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले होते. मात्र पहिल्यावहिल्या WPL ट्रॉफीवर मुंबईनं नाव कोरलं आहे. मुंबईच्या रणरागिणींकडून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवत विक्रम केला आहे.
मुंबईची खराब सुरुवात…
१३२ धावांचे टप्पा गाठताना, मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक) अवघ्या २३ धावात बाद झाल्या. मात्र त्यानंतर आलेल्या नॅटली सिव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीने मुंबईचा डाव सावरला. हरमनप्रीत कौर ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. मात्र सिव्हर-ब्रंटने एक बाजू लावून शानदार अर्धशतक झळकावले. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. या विजयामुळं मुंबईन ऐतिहासिक कामगिरी करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
दिल्लीचे माफक आव्हान…
दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या माेबदल्यामध्ये १३१ धावा काढल्या. वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ पहिल्या सत्रातील डब्ल्यूपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक हाेता. मात्र, टीमचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. इस्सी वाेंग (३/४२), हिली मॅथ्यूज (३/५), अमेलिया केर (२/१८) आणि ब्रंटने (नाबाद ६०) उल्लेखनीय खेळीतून मुंबई इंडियन्स संघाला पहिल्याच सत्रातील महिला प्रीमियर लीगचा किताब जिंकून दिला. यासह हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रविवारी फायनलमध्ये मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मुंबई संघाने १९.३ षटकांमध्ये ७ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली.
मुंबई इंडियन्सला ट्राॅफी व ६ काेटींचे बक्षिस
किताब विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला ट्राॅफी आणि ६ काेटींचे बक्षिस देऊन गाैरवण्यात आले. दिल्ली संघ उपविजेता ठरला. पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगच्या विजेत्यांवर आता १० कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव केला गेला आहे. पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणारा मुंबई संघाल ६ कोटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. तसेच उपविजेत्या दिल्ली संघाचा ३ कोटींचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या यूपी वॉरियर्ज संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचाझयीने प्राेफेशनल लीगमध्ये आठव्या किताबाचा बहुमान पटकावला. यामध्ये राेहित शर्माच्या नेतृत्वातील सात आणि हरमनप्रीतच्या नेतृत्वातील एका किताबाचा समावेश आहे.मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पाच व चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये दाेन वेळा चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. आता हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने पहिला डब्ल्यूपीएल किताब जिंकला.