फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Delhi Capitals vs Mumbai Indians match report : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने हा सामना १२ धावांनी जिंकला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने हा स्पर्धेचा दुसरा विजय नोंदवला आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला पराभव आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघासाठी रायन रिकेल्टन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांनी धावा केल्या.
यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघासाठी रायन रिकेल्टन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांनी धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिला विकेट संघाने लवकर गमावला होता, जेक फ्रेझर-मॅकगर्कला पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरने बाहेरचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या दोन फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम गाळला होता. पण कर्ण शर्माला कॅप्टन हार्दिक पंड्याने गोलंदाजी दिली आणि त्याने त्याच्या फिरकीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला.
ARE YOU NOT ENTERTAINED? 🤩
A #TATAIPL classic in Delhi goes #MI‘s way 👏
Updates ▶ https://t.co/sp4ar86EKb#DCvMI | @mipaltan pic.twitter.com/yMODbfnT6s
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचं सांगायचं झालं तर कर्ण शर्माने संघासाठी ३ विकेटस घेतले, यामध्ये त्याने कर्ण शर्मा, केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स याना तीन मजबूत खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल सॅटनरने संघासाठी २ विकेट्स घेतले. जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. तिलक वर्माने संघासाठी अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने संघासाठी ३३ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला विकेट गेल्यानंतर दिल्लीचे दोन फलंदाज करुण नायर आणि अभिषेक पोरेल यांनी संघासाठी दमदार खेळी खेळली. करुण नायरला या आयपीएलच्या सीझनमध्ये पहिल्यादाच खेळण्याची संधी मिळाली. आज त्याला संघामध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये खेळवण्यात आले. संघाचा विकेट गेल्यानंतर करुण नायरने संघासाठी धुव्वादार फलंदाजी केली. करुणने संघासाठी ४० चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या, यामध्ये त्याने १२ चौकार ५ षटकार मारले. तर अभिषेक पोरेलने संघासाठी २५ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ३ चौकार मारले.