
किरॉन पोलार्डला मिळाले मुंबई इंडियन्सचे हेड कोच पद (फोटो सौजन्य - Instagram)
मुंबई इंडियन्सची सहमालक असणाऱ्या नीता अंबानी यांनी पोलार्डच्या या नवनियुक्तीवर आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, ‘पोलार्ड २२ व्या वर्षापासून तरूण खेळाडू म्हणून MI सह जोडला गेला आणि तब्बलगेल्या १६ वर्षांपासून तो या कुटुंबाचा अविभाज्य भाग राहिला आहे.’ यानंतर नीता अंबानी यांनी पोलार्ड आपल्या अनुभव, समजूतदारपणा आणि वचनबद्धतेसह हा संघ जोडून ठेवेल आणि यशाचा एक नवा अध्याय सुरू करेल असा विश्वासही यावेळी दर्शविला.
हेड कोचची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर किरॉन पोलार्डने आपला आनंद आणि सन्मान दोन्ही व्यक्त केला. पोलार्डने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘Mumbai Indians च्या हेड कोचची जबाबदारी पेलणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा आणि करिअरचा खूप मोठा भाग आहे आणि हा संघ, खेळाडू आणि पलटणसह माझं जे नातं आहे ते अत्यंत अनोखं आणि अनमोल आहे. एक खेळाडू आणि एक कोच म्हणून काम केल्यानंतर मुंबई इंडियन्सचे हे प्रतिनिधित्व किती महत्त्वाचे आहे आणि ही निळी जर्सी घातल्यानंतर किती जबाबदारी येते याची पूर्ण कल्पना आहे’
किरॉन पोलार्डची मुंबई इंडियन्ससोबतची कारकीर्द शानदार आणि अत्यंत यशस्वी राहिली आहे. फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी तो एक मानला जातो.
IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा