फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Delhi Capitals vs Mumbai Indians : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटलचा कर्णधार अक्षर पटेल यांनी नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत मुंबई इंडियन च्या संघाने 205 धावांचं लक्ष उभे केले आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि रियन रिकल्टन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. एकीकडे दिल्लीच्या संघाला या स्पर्धेमध्ये अजुनपर्यत एकही पराभवाला सामोरे जावे लागले नाही तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाला सामन्यांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. आजच्या सामन्यात पहिल्या डावांमध्ये खेळाडूंची कामगिरी कशी होती यावर एकदा नजर टाका.
पण रोहित शर्मा आणखी एकदा मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्माने १२ चेंडूंमध्ये 18 धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि २ चौकार मारले. रियन रिकल्टन याने संघासाठी चांगला खेळ दाखवला त्याने २५ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ५ चौकार ठोकले. ही त्याची आयपीएल २०२५ मधील दुसरी मोठी खेळी होती याआधी त्याने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध खेळी खेळली होती. सूर्यकुमार यादवच्या बॅटमधील आज ४० महत्वाच्या धावा आल्या यामध्ये त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. हार्दिक पंड्या या सामन्यात फेल ठरला. त्याने ४ चेंडू खेळले आणि विप्रजने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर कुलदीप यादव याने त्याच्या फिरकीची जादू दाखवली त्याने संघासाठी २ विकेट्सची कमाई केली. तर संघाचा युवा फलंदाजाने सुद्धा कौतुकास्पद गोलंदाजी दाखवली आणि संघासाठी २ विकेट्स घेतले. मुकेश कुमारने संघासाठी १ विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये घेतला.