फोटो सौजन्य - Mumbai Indians/Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : भारताचा पुरुष संघ सध्या चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे, तर भारतामध्ये महिला प्रीमियर लीग सुरु आहे. आज वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ च्या दोन दिग्गज आणि मागील दोन वर्षांमध्ये चॅम्पियन झालेल्या संघामध्ये सामना रंगणार आहे. सलग दोन विजयांनी उत्साहित, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर सामना करताना महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवण्याचा प्रयत्न करेल. आरसीबीने आतापर्यंत या सीझनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सविरुद्ध त्यांनी २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले होते आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचाही सहज पराभव केला होता. वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाचे चार गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेतील इतर कोणत्याही संघाने अद्याप त्यांचे सर्व सामने जिंकलेले नाहीत. चिन्नास्वामी स्टेडियमवरील प्रेक्षकांकडून आरसीबी संघाला प्रचंड पाठिंबा मिळेल याची खात्री आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा मंधानावर असतील, ज्याने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ४७ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली होती.
NAMASKARA BENGALURU! 😍
It’s our 1️⃣st home game of the season and we’re buzzing with excitement to see our 12th Man Army back in the stands cheering for us. 🌟
Get ready for some magic at our fortress! 🏟#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2025 #RCBvMI pic.twitter.com/IcUAzvH0X8
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 21, 2025
भारतीय संघाची उपकर्णधार मानधना सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि मुंबईच्या गोलंदाजांना तिला रोखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागणार आहेत. गुणतालिकेमध्ये मुंबई इंडिअन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, मुंबईचे दोन सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी एक सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मंधाना व्यतिरिक्त, एलिस पेरी, राघवी बिश्त, रिचा घोष आणि तरुण कनिका आहुजा यांनीही आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. तथापि, आरसीबीला त्यांच्या गोलंदाजी विभागाबद्दल थोडी चिंता असेल कारण त्यांचे गोलंदाज आतापर्यंत अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेले नाहीत. मुंबईचा संघ खूप मजबूत आहे आणि त्यांना हरवणे सोपे नसेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, नॅट सायव्हर-ब्रंटची उत्कृष्ट फलंदाजी (५९ चेंडूत ८० धावा) आणि हरमनप्रीतसोबत तिने केलेल्या ७३ धावांच्या भागीदारीनंतरही, संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ जोरदार पुनरागमन करण्यासाठी वचनबद्ध असेल.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), नदीन डी क्लार्क, संस्कृती गुप्ता, सईका इशाक, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता, जी कमलिनी, अमनदीप कौर, अमनजोत कौर, सत्यमूर्ती कीर्तना, अमेलिया केर, अक्षिता माहेश्वरी, हेली मॅथ्यूज, सजीवन सजना, नॅट सायव्हर-ब्रंट, पारुनिका सिसोदिया, क्लो ट्रायॉन.
स्मृती मानधना (कर्णधार), कनिका आहुजा, एकता बिश्त, चार्ली डीन, किम गार्थ, रिचा घोष (विकेटकिपर), हीथर ग्राहम, व्हीजे जोशिता, सब्बिनेनी मेघना, नुझहत परवीन, जगरवी पवार, एलिस पेरी, राघवी बिस्ट, स्नेह राणा, प्रेमा रावत, रेणुका सिंग, जॉर्जिया वेअरहॅम, डॅनी व्याट-हॉज.