
Got rejected against Australia! Jaiswal's bat spewed fire upon returning to India; rained down runs
Yashasvi Jaiswal’s brilliant innings against Rajasthan : भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र त्याला मैदानावर एकही सामना खेळायला मिळाला नाही. तथापि, भारतात परतल्यानंतर त्याने आपली क्षमता सिद्ध करत एक शानदार खेळी केली. खरं तर, २०२५-२६ रणजी ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईकडून मैदानात उतरला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानविरुद्ध त्याने एक दमदार खेळी केली आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
हेही वाचा : Pro Kabaddi League S12 : दबंग दिल्लीचा जलवा कायम! दुसरे PKL जेतेपद केले नावावर; पुणेरी पलटनला चारली धूळ
यशस्वी जयस्वालने राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात एक शानदार खेळीचे प्रदर्शन केले. डावाची सुरुवात करताना त्याने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. त्याने ९७ चेंडूत ६७ धावा फटकावल्या. त्याने या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावेल. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण अनिकेत चौधरीच्या चेंडूवर त्याला माघारी जावे लागले. तथापि, जयस्वालने संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोठी भूमिका बाजवली आणि त्याला माघारी जावे लागले.
यशस्वी जयस्वालसाठी मुंबईसाठी हा पुनरागमन सामना होता, कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच जयस्वाल मुंबईच्या रणजी संघातून बाहेर पडण्याच्या विचारात होता. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी देखील मिळवली होती. तथापि, अखेरच्या क्षणी जयस्वालने आपला विचार बदलला आणि तो मुंबई संघासोबतच राहिला.
भारतीय संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे, यशस्वी जयस्वालसाठी हा रणजी ट्रॉफी सामना सरावाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान, मुंबई सध्या नऊ गुणांसह एलिट ग्रुप डी मध्ये अव्वल स्थानी आहे. पहिल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा पराभव केल्यानंतर, मुंबईला छत्तीसगडविरुद्धच्या पहिल्या घरच्या सामन्यात तीन गुणांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे, मुंबई संघाला या सामन्यात मोठ्या विजयाची अपेक्षा असणार आहे.