
पहिल्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून सिरीजमध्ये बरोबरी करण्याचा बांग्लादेशचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याच्या आधी बांग्लादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज आणि विकेटकिपर मुशफिकुर रहीम संघाभेर गेला आहे. २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाहीये.
मूशफिकुर रहीमच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीये. या सिरीजमधला दुसरा सामना २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत बांग्लादेशच्या संघाची चिंता वाढली आहे. आधीच पहिला पराभव झालेल्या बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याला डाव्या ग्रोइनच्या भागात तीव्र वेदना जाणवल्या होत्या. सामना झाल्यावर त्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे दुखापत अधिक वाढू नये म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला तातडीने विश्रांती आणि विशेष रिहॅबिलिटेशनचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीये.
पहिल्या कसोटी सामन्यात साऊथ आफ्रिकेने बांग्लादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे सिरीजमध्ये आफ्रिकेचा संघ १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना बांग्लादेशसाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना देखील गमावल्यास बांग्लादेश सिरीजमध्ये पराभूत होईल. तसेच त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील उलथापालथ होऊ शकते.
जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशचा ९ विकेट्स राखून पराभव केला. दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज सायमन हार्मर दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला.
Ans: बांग्लादेशचा अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक मुशफिकुर रहीम याच्या डाव्या पायाच्या ग्रोइन भागात दुखापत झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती आणि विशेष रिहॅबिलिटेशनचा सल्ला दिला आहे.
Ans: दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.