Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports 2025: नाशिकच्या आर्याचे रूपेरी यश; नेमबाजीत खेचून आणले ‘रौप्यपदक’

महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणार्‍या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 30, 2025 | 08:33 PM
38th National Sports 2025: नाशिकच्या आर्याचे रूपेरी यश; नेमबाजीत खेचून आणले 'रौप्यपदक'

38th National Sports 2025: नाशिकच्या आर्याचे रूपेरी यश; नेमबाजीत खेचून आणले 'रौप्यपदक'

Follow Us
Follow Us:

डेहराडून: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते असे आपण नेहमी म्हणतो हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत आज येथे दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले.

महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणार्‍या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत आर्याने दुसरे स्थान घेत अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात तिने अन्य दोन खेळाडू समवेत तिने आघाडी घेतली होती. मात्र अठराव्या नेमच्या वेळी ती चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी तिला पदक मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती तथापि तिने शेवटच्या चार नेम मध्ये अतिशय संयम आणि आत्मविश्वास दाखवीत पदक खेचून आणले.

हेही वाचा: 38th National Sports 2025 : महाराष्ट्राने मारला पदकांचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी, आदिती, ओमला कांस्य

पदकाची खात्री होती- आर्या

गतवेळच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला पदक मिळवता आले नव्हते त्याची खंत मला सतत जाणवत होती. यंदा या स्पर्धेमध्ये आपण पदक जिंकायचेच या दृष्टीने मी भरपूर सराव केला होता त्यामुळेच पदक जिंकण्याची मला खात्री झाली होती असे आर्या हिने सांगितले. यंदा जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या भारतीय संघाच्या निवड चाचणीत भाग घेत सर्वोत्तम यश मला मिळवायचे आहे अर्थात ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत पदक मिळवणे हे माझे मुख्य ध्येय आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने माझी वाटचाल असेल असे तिने सांगितले.

आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेलो इंडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. महाविद्यालयाकडून तिला भरपूर सहकार्य मिळत आहे त्यामुळेच मी फक्त नेमबाजीच्या सरावावर लक्ष ठेवू शकते असेही तिने सांगितले.

रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने अंतिम फेरीत

महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने यांनी पुरुषांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत पाटील याने 633.8 गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे तर पार्थ हा तिसर्‍या क्रमांकावर असून त्याचे 632.6 गुण झाले आहेत.

Web Title: Nashik girl aarya borase won silver medal in shooting game at 38 th national games uttrakhanad sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • 38th India National Games

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.