IND vs ENG 1st Test Match: India and England players took to the field wearing black armbands; BCCI explained the reason..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. लीड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. आज पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले आहेत. यामागील कारण समोर आले आहे. २३ जूनच्या रात्री भारताचे माजी खेळाडू दिलीप दोशी यांचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघासह इंग्लंड संघानेही त्यांना सामना सुरू होण्यापूर्वी दिलीप दोशी यांना श्रद्धांजली वाहिली आणि एक मिनिट शांतता पाळली.
दिलीप दोशी हे भारताच्या सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक फिरकीपटू होते आणि त्यांनी १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. बिशन सिंग बेदी निवृत्त झाल्यानंतर दोशी यांनी १९७९ मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी १९८३ पर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ११४ बळी घेतले होते. या दरम्यान त्यांनी विरोधी फलंदाजांना नियंत्रात ठेवले.
हेही वाचा : IND vs ENG : लीड्समध्ये शतकी तडाखा, तरी शतकवीर KL RAHUL ने व्यक्त केली खंत; केला मोठा खुलासा..
बीसीसीआयकडून देखील दिलीप दोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बीसीसीआयने श्रद्धांजली वाहताना एक्स वर ट्विट केले की, सोमवारी निधन झालेले माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन्ही संघ आज काळ्या पट्ट्या बांधून खेळत आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपूर्वी एक मिनिट मौन पाळण्यात आले आहे.
दिलीप दोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या ओळखींव्यतिरिक्त, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “दिलीप दोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते फिरकी गोलंदाजीचे खरे कलाकार होते. ते मैदानाच्या आत आणि बाहेर एक सज्जन आणि भारतीय क्रिकेटचे समर्पित सेवक होते. भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहणारे आहे.”
Both teams are wearing black armbands today in memory of former Indian cricketer Dilip Doshi, who passed away on Monday.
The teams also observed a minute’s silence before the start of Day 5. pic.twitter.com/1npOAo4ihp
— BCCI (@BCCI) June 24, 2025
हेही वाचा : IND Vs ENG : ‘विश्वास ठेवणार नसाल तर का खेळवायचे..?’, दिनेश कार्तिकचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला..
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी देखील दोशी यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, “दिलीप दोशी हे एक महान क्रिकेटपटू आणि खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या प्रत्येक चेंडूत खेळाबद्दलची त्यांची आवड स्पष्टपणे दिसून येत होती. त्यांचे वर्तन शांत आणि स्पर्धात्मक असे होते.”