दिनेश कार्तिक(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. पहिला सामना हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळवला जात आहे. आतापर्यंत सामन्याचे चार दिवस खेळून झाले आहेत. अशा परिस्थितीत आज सामन्याचा पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. भारताने दुसऱ्या डावात ३७१ धावांचे टार्गेट दिले आहे. शेवटच्या दिवशी इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. त्याच वेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला जिंकण्यासाठी १० विकेट्स घ्याव्या लागणार आहेत.
यापूर्वी सामन्यादरम्यान टीम इंडियाकडून चूक झाली आहे. टीम इंडियाची ही चूक इंग्लंडलाही फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ठरू त्यामुळेच इंग्लंड संघ अजूनही सामन्यात टिकून आहे. माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक टीम इंडियाच्या या चुकीवर चांगलाच संतापलेला दिसून आला आहे. त्याने टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर प्रश्न नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
शार्दुल ठाकूरला हेडिंग्ले कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याला चौथा गोलंदाज म्हणून खेळवण्यात आले आहे. त्याच वेळी, टीम इंडियाने पहिल्या डावात १००.४ षटके टाकेपर्यंत त्याचा योग्य करण्यात आला नाही. शार्दुलने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध फक्त ६ षटकेच टाकली. दिनेश कार्तिकच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिल्यानंतर देखील त्याला कमी षटके टाकण्यास भाग पाडले.
दिनेश कार्तिकने क्रिकबझशी बोलताना म्हटले की, “टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शार्दुल ठाकूरच्या निर्णयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर ते त्याच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवणार नसतील तर ते त्याला का खेळवत आहेत? हा निश्चितच एक मोठा मुद्दा आहे.” असे कार्तिक म्हणाला.
हेही वाचा : इंग्लडमध्ये सर्वात लांब खेळी खेळणारे भारताचे कर्णधार, वाचा संपुर्ण यादी
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “जर तुम्ही एखाद्या गोलंदाजावर विश्वास ठेवणार नसाल तर त्याला का खेळवत आहात? मला समजते की जेव्हा तुम्ही चार वेगवान गोलंदाजांना खेळवता तेव्हा तुम्ही शार्दुलला समान संधी देणार नाही.”
सामन्याची स्थिती..
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून भारताने इंग्लंडसमोर ४७१ धावांचे टार्गेट दिले आहे. तर प्रतिउत्तरत चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने २१ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंडने २१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली तेव्हा इंग्लंडच्या ४१ धावा झाल्या आहेत. जॅक क्रॉली २० धावा आणि बेन डकेट २० धावांवर खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३३० धावा तर भारताला १० विकेट्स हव्या आहेत.