Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळचा दणदणीत विजय! यूएईवर मात करत पटकावले आशिया कप २०२७चे तिकीट; आसिफ शेखची शतकी खेळी

Nepal qualified for asia cup 2027 Beat UAE: नेपाळने एसीसी पुरुष प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीला ४४ धावांनी पराभूत करून २०२७ च्या आशिया कपसाठी पात्रता मिळवली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 12, 2026 | 08:51 PM
Nepal qualified for asia cup 2027

Nepal qualified for asia cup 2027

Follow Us
Follow Us:
  • आसिफ शेखच्या शतकाचा जलवा
  • नेपाळने यूएईला हरवले
  • आशिया कप २०२७मध्ये मिळवले स्थान
नेपाळ क्रिकेट संघाने २०२७ च्या आशिया कपसाठी पात्रता मिळवली आहे. एसीसी मेन्स प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात नेपाळने संयुक्त अरब अमिरातीला (UAE) ४४ धावांनी पराभूत केले. या विजयामुळे नेपाळने २०२७ च्या आशिया कपमधील आपले स्थान निश्चित केले. क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेपाळने ९ विकेट्स गमावून ३१३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, युएईचा संघ ४९.१ षटकांत २६९ धावांवर सर्वबाद झाला. नेपाळच्या विजयाचा नायक आसिफ शेख होता, ज्याने शानदार फलंदाजी करत १०२ धावांचे शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमधील नेपाळची ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

टेनिस स्पर्धेत अमरावती संघाचे विजेतेपद, शेगाव संघाला मिळाला उपविजेतेपद; तब्बल २२ संघांचा समावेश

नेपाळच्या आसिफ शेखने झळकावले शानदार शतक

क्वालालंपूरमधील बायमास ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या एसीसी मेन्स प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, आसिफ शेख आणि अर्जुन कुमाल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची सलामीची भागीदारी करून नेपाळला भक्कम सुरुवात करून दिली. कुमाल ६३ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ४३ धावा करून बाद झाला. दरम्यान, आसिफ खेळपट्टीवर टीकून राहिला. त्याने कर्णधार रोहित पौडेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. आसिफने शानदार फलंदाजी करत १०६ चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारांसह १०२ धावा केल्या. हे त्याचे दुसरे एकदिवसीय शतक होते. नेपाळने ५० षटकांत ९ विकेट्स गमावून ३१३ धावा केल्या, जी युएईविरुद्धची त्यांची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे. यापूर्वी, नेपाळने मे महिन्यात कीर्तिपूर येथे युएईविरुद्ध २८९ धावा केल्या होत्या.

🚨 NEPAL QUALIFIED INTO THE MEN’S ODI ASIA CUP 2027 🔥 – The 6 teams in Asia Cup are India, Pakistan, Nepal, Sri Lanka, Afghanistan & Bangladesh. pic.twitter.com/GCPrSumUSZ — Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2026

नेपाळचा यूएईवर दणदणीत विजय

३१४ धावांचे लक्ष्य गाठताना युएई संघाने चांगली सुरुवात केली. पण एकापाठोपाठ एक विकेट पडल्याने त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. मात्र, स्टार फलंदाज राहुल चोप्राने शतक झळकावले आणि १०० धावांवर नाबाद राहिला. टॅनिस सुरीने ४२ आणि कर्णधार हरप्रीत भाटियाने ३३ धावा केल्या, पण त्यांना संघाला विजयाजवळ नेता आले नाही. युएईचा संघ ४९.१ षटकांत २६९ धावांवर सर्वबाद झाला.नेपाळकडून करण केसीने तीन विकेट्स घेतले, तर ललित राजबोंगशीने दोन विकेट्स मिळवले. संदीप लामिछाने, रोहित पौडेल, गुलसन झा, बशीर अहमद आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

नेपाळ आशिया कप २०२७ साठी पात्र

या विजयामुळे नेपाळ २०२७ च्या एकदिवसीय आशिया चषकासाठी पात्र ठरला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेद्वारे (ACC) आयोजित पुरुष प्रीमियर चषकाच्या विजेत्याला आशिया चषकात स्थान मिळते. नेपाळच्या पात्रतेमुळे २०२७ च्या एकदिवसीय आशिया चषकासाठी सहा संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे देश आशिया चषकासाठी आधीच पात्र ठरले आहेत. २०२७ चा आशिया चषक १८ जून ते ४ जुलै दरम्यान बांग्लादेशमध्ये आयोजित केला जाईल.

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Web Title: Nepal qualified asia cup 2027 beat uae aasif sheikh century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Nepal Cricket Team

संबंधित बातम्या

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान
1

IND W Vs BAN W: शेफाली वर्माचे वादळी अर्धशतक! हरमनप्रीतचा फिनिशिंग टच, बांग्लादेशसमोर मजबूत आव्हान

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
2

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?
3

IND vs BAN: सेमीफायनलचा महामुकाबला! भारत-बांग्लादेश भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना?

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…
4

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.