Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 वर्ष आणि 637 विकेट्स…न्यूझीलंडच्या या दिग्गज खेळाडूने क्रिकेटला केला अलविदा! भारत दौऱ्यामधून खेळाडूला वगळलं

३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे त्रस्त होता, ज्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 29, 2025 | 11:56 AM
फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मिडिया

फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे त्रस्त होता, ज्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. त्याच्या कारकिर्दीत, त्याने न्यूझीलंडला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २०२३ मध्ये किवी संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला.

डग ब्रेसवेल निवृत्त

डग ब्रेसवेल (New Zealand all-rounder Doug Bracewell retires) यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे डिसेंबर २०११ मध्ये होबार्ट कसोटी, जेव्हा त्यांनी त्यांच्या तिसऱ्या कसोटीत फक्त ६० धावा देऊन ९ बळी घेतले. या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला २६ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकता आला, जो आजपर्यंतचा त्यांचा शेवटचा कसोटी विजय आहे.

IND vs SA U19 Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेसवेलने २८ सामन्यांमध्ये ७४ बळी घेतले, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण ४६ बळी घेतले. आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीच्या समाप्तीची घोषणा करताना, ब्रेसवेल म्हणाले, क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा अभिमानाचा भाग आहे. लहानपणापासूनच मी माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे. मला मिळालेल्या संधींबद्दल मी नेहमीच आभारी राहीन.

डग ब्रेसवेलच्या कुटुंबाचे क्रिकेटशी खोलवरचे नाते आहे. त्याचे वडील ब्रेंडन आणि काका जॉन ब्रेसवेल हे कसोटी क्रिकेट खेळले होते, तर जॉनने न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. तो त्याचा चुलत भाऊ मायकेल ब्रेसवेल सोबत न्यूझीलंडकडूनही खेळला, जो पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यावर एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल.

News | Allrounder Doug Bracewell has announced his retirement from all cricket. Bracewell played 28 Tests, 21 ODIs and 20 T20Is for New Zealand taking 120 wickets and scoring 915 runs. He played a key role in New Zealand’s last Test victory over Australia, in Hobart in 2011,… pic.twitter.com/rdLjGeBQzL — BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2025

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही दाखवली चमक 

३५ वर्षीय डग  ब्रेसवेलने २००८ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सेंट्रल स्टॅग्ससाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या प्रतिभेमुळे त्याला २०१० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी निवड झाली आणि त्याच्या प्रभावी प्रथम श्रेणी कामगिरीमुळे त्याला ऑक्टोबर २०११ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय संघात स्थान मिळाले .

२०११ मध्ये त्याने किवी संघाकडून पदार्पण केले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात आशादायक झाली. अनेक वरिष्ठ गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे त्याला कसोटी पदार्पण मिळाले , जे त्याने झिम्बाब्वेविरुद्ध केले . पदार्पणाच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेऊन त्याने सर्वांना प्रभावित केले . त्यानंतर त्याने आपला प्रभावी फॉर्म सुरू ठेवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, ब्रेसवेलने आयपीएल २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, एसए२० २०२४ मध्ये जोबर्ग सुपर किंग्ज आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली. डग ब्रेसवेलचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आहे. त्याने ४,००० हून अधिक धावा आणि ४०० विकेट्स केल्या, ही कामगिरी न्यूझीलंडमधील फार कमी खेळाडूंनी केली आहे. त्याच्या १३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ४३७ विकेट्स घेतल्या आणि ४,५०५ धावा केल्या.

Web Title: New zealand all rounder doug bracewell announces retirement from international domestic cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • Sports

संबंधित बातम्या

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
1

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाद वसीमने पत्नी सानिया अश्रफला दिला घटस्फोट, दुसऱ्या महिलेने लग्न मोडले का?
2

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाद वसीमने पत्नी सानिया अश्रफला दिला घटस्फोट, दुसऱ्या महिलेने लग्न मोडले का?

IND vs SA U19  Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
3

IND vs SA U19 Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral
4

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.