
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनचा वनडे क्रिकेटला अलविदा! (Photo Credit- X)
Women’s World Cup 2025: महिला विश्वचषक २०२५ चा २७ वा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी केली आणि ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर, न्यूझीलंडला मोठा धक्का बसला जेव्हा किवी कर्णधार सोफी डेव्हिनने (Sophie Devine) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडच्या खेळाडूंनी सोफी डेव्हिनला गार्ड ऑफ ऑनर दिला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
A special guard of honour for Sophie Devine as she retires from the 50-over format after 19 years 🥹🖤#ENGvNZ | #CWC25 pic.twitter.com/zSUyaJu2oG — ICC (@ICC) October 26, 2025
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये न्यूझीलंडचा प्रवास संपला आहे. सोफी डेव्हिनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने खराब कामगिरी केली. न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. नॉकआउट सामन्यात न्यूझीलंड टीम इंडियाकडून पराभूत झाला. खेळलेल्या ७ पैकी १ सामना न्यूझीलंडने जिंकला, ४ गमावले, तर २ सामने पावसामुळे वाया गेले.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन सामन्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. विजयासह क्रिकेटला अलविदा करण्याची तिची इच्छा अपूर्ण राहिली, हे तिने कबूल केले. ती म्हणाली, “मी जितका विचार केला होता, तितके मी रडले नाही.” निवृत्तीची घोषणा लवकर केल्याने झालेले फायदे सांगताना ती म्हणाली, “लवकर घोषणा करण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे मला माझ्या भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. हा दिवस आनंदात घालवण्याची आणि १९ वर्षांपूर्वीच्या माझ्या कारकिर्दीची सुरुवात आठवण्याची ही एक चांगली संधी होती.” सोफी डिव्हाईन ही न्यूझीलंडसाठी एकदिवसीय सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा मान फक्त सुझी बेट्स यांच्याकडे आहे.
३६ वर्षीय सोफीने न्यूझीलंडसाठी १५९ सामने खेळले आहेत. तिने ३२.६६ च्या सरासरीने ४२७९ धावा केल्या आहेत. तिने तिच्या कारकिर्दीत ९ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, तिने १४६ टी-२० सामन्यांमध्ये २८.१२ च्या सरासरीने ३४४१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २१ अर्धशतके आणि एक शतक समाविष्ट आहे. तिने चेंडूनेही असाधारण कामगिरी केली आहे. तिने एकदिवसीय सामन्यात १११ बळी आणि टी-२० मध्ये ११९ बळी घेतले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३८.२ षटकांत १६८ धावा केल्या. सोफी डेव्हाईनने ३५ चेंडूंत २३ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडने २९.२ षटकांत ५ बाद १७२ धावा करून लक्ष्य गाठले.