फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मीडिया
India vs New Zealand T20 Series : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज मालिकेचा शेवटचा सामना पार पडला. न्यूझीलंडच्या संघाने आज मालिकेच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तनाच्या संघाला ८ विकेट्सने पराभूत करून मालिका ४-१ अशी नावावर केली आहे. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता यामध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका आयोजित करण्यात आली होती. या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने सलग विजय मिळवून मालिका एकतर्फी जिंकवण्याचा प्रयत्न केला होता पण तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला पराभूत केले होते आणि अशावेळी पाकिस्तानचा संघ मालिकेमध्ये पुनरागमन करेल अशी आशा होती पण न्यूझीलंडच्या संघाने हे शक्य होऊ दिले नाही.
तिसरा सामनात विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने सलग दोन्ही सामने जिंकून मालिका चार एक विजय मिळवून मालिकेचे ते पद नावावर केले आहे. या मालिकेमध्ये पाकिस्तान संघाचे कर्णधार पद सलमान अली आघा आणि न्यूझीलंडच्या संघाचे कर्णधारपद मिचेल ब्रेसवेल याच्याकडे होते.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील झालेल्या मालिकेच्या पाचव्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल ब्रेसवेल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पाकिस्तान संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाने २० ओव्हरमध्ये १२८ धावा गेल्या होत्या. पाकिस्तान संघासाठी सर्वाधिक धावा सलमान आली आघा याने केल्या होत्या. सलमान अलीने ३९ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी खेळली होती त्यानंतर एकही खेळाडू ३० धावांचा टप्पा पार करू शकला नाही. सदाब खानने आणि २० चेंडूंमध्ये २८ धावा केल्या होत्या.
Finishing the KFC T20I series with a bang! Tim Seifert (97*) finishes off a clinical all-round performance as the BLACKCAPS win the series 4-1. Catch up on the scores | https://t.co/TZTAt6S23R 📲 #NZvPAK #cricketnation pic.twitter.com/P96yGhh8oy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 26, 2025
न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानने उभे केलेले लक्ष्य १० षटकांमध्येच पूर्ण केले. न्यूझीलंडच्या संघाने दोन विकेट्स गमावून १३१ धावा करून सामना जिंकला. टिम सेफर्ट याने संघासाठी दमदार खेळी खेळली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ९७ धावा केल्या. तर फिन एलेन याने १२ मध्ये २७ धावा केल्या. न्यूझीलंड संघाचा गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर जेन्ट्स निशाम याने संघासाठी पाच विकेट घेतले तरजेकब डफी याने संघासाठी दोन विकेट्स घेतले आणि बेन शेअर्स आणि ईश सोडी या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.