Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lucknow Super Giants मधून के एल राहुलचा पत्ता कट? या कॅरेबियन खेळाडूला लागला जॅकपॉट

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावापूर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोएंका यांची भेट घेतली. तर निकोलस हा 18 कोटींसह पहिला रिटेन्शन प्लेअर ठरला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 30, 2024 | 12:03 PM
लखनौ सुपर जाएंट्समध्ये कॅरेबियन प्लेअरची जागा निश्चित

लखनौ सुपर जाएंट्समध्ये कॅरेबियन प्लेअरची जागा निश्चित

Follow Us
Close
Follow Us:

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन हा इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी पहिला अधिकृत रिटेन केलेला खेळाडू बनला आहे. वृत्तानुसार, कोलकात्यात लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची भेट घेऊन पुरनने करारावर शिक्कामोर्तब केले आहे. पुरन आणि लखनौ यांच्यातील हा करार नंबर वन टिकवण्यासाठी आहे. म्हणजेच निकोलस पुरनला लखनौ सुपरजायंट्समध्ये 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात येईल असा करार करण्यात आला आहे. 

वास्तविक, यापूर्वी असे मानले जात होते की कर्णधार केएल राहुलला 18 कोटींमध्ये कायम केले जाईल, परंतु फ्रँचायझी आणि राहुल यांच्यात चर्चा झाली नाही असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे निकोलस पूरनने ही संधी साधली असल्याचीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत, जर निकोलस पूरनला लखनौने 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले, तर या लीगमधील वेस्ट इंडिजच्या या फलंदाजासाठी ही सर्वात मोठी रक्कम असेल. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

आधीची किंमत 16 कोटी 

निकोलस पूरन हा टी-20 क्रिकेटमधला हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखला जातो. यामुळेच या फॉर्मेटमध्ये पूरनबाबत खूप हाईपदेखील आहे. 2023 मध्ये लखनौच्या टीमने 16 कोटी रुपयांची बोली लावून निकोलसची खरेदी केली होती. लखनौला येण्यापूर्वी निकोलस पूरन सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता, पण जेव्हा तो लखनऊ सुपरजायंट्स संघात सामील झाला तेव्हा त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे.

हेदेखील वाचा – Champions Trophy: पाकिस्तानचा नवा कॅप्टन रिझवानची आशा, ‘भारताचे पाकिस्तानमध्ये…’

काय आहे कारण 

यामागचे मोठे कारण म्हणजे गेल्या मोसमात लखनौसाठी निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 178.21 च्या स्ट्राईक रेटने 499 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळेच निकोलसचा लखनऊसोबत 18 कोटींचा करार निश्चित झाला आहे असा तर्क लावण्यात येत आहे. 

केएल राहुलचे भविष्य काय?

केएल राहुल सध्या फॉर्ममध्ये नाही यात शंका नाही, पण जर राहुल लिलावात आला तर अनेक फ्रँचायझी त्याला मैदानात उतरवू शकतात. विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला त्यांच्यासोबत राहुलचा समावेश करायचा असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत लखनऊ संघाने राहुलला सोडले तर तो आरसीबी संघात सामील होण्याची सर्वाधिक शक्यता आहे असे सध्या म्हटले जात आहे. मात्र LSG के एल राहुलला सोडून देणार की नाही याची चर्चा सध्या अधिक रंगली आहे. 

नक्की काय घडले होते?

मागच्या वर्षी आयपीएल दरम्यान लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका आणि के एल राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संघ हरल्यानंतर राहुलला संजीव गोएंका यांचा राग संपूर्ण जगासमोर पत्करावा लागला होता आणि यानंतर संजीव गोएंका यांना खूपच ट्रोलही करण्यात आले होते. मात्र के एल राहुलने याबाबत मौन बाळगणे अधिक योग्य समजले आणि त्याने या घटनेवर कुठेही कोणतीही चर्चा केली नाही. 

हेदेखील वाचा – BAN Vs SA: दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशवर साऊथ आफ्रिकेची मजबूत पकड; WTC फायनलसाठी भारताचे टेन्शन वाढले

Web Title: Nicholas pooran becomes first lucknow super giants retention for ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • IPL 2025
  • k l rahul
  • Nicholas Pooran

संबंधित बातम्या

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
1

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.