कोण खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (फोटो- @ProteasMenCSA)
BAN Vs SA: सध्या साऊथ आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. कसोटी मालिकेतील दूसरा सामना साऊथ आफ्रिका आणि बांग्लादेशचे संघ खेळत आहेत. दरम्यान साऊथ आफ्रिकेने बांग्लादेशविरुद्धच्या या सामन्यात मजबूत पकड केली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिका देखील वॉर्डल टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या स्पर्धेत आली आहे. सध्या या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. मात्र न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यात पराभव झाल्याने यामध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता साऊथ आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड केल्याने भारताची चिंता वाढली आहे.
साऊथ आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. पहिल्याच दिवशी बांग्लादेशविरुद्धचा सामना साऊथ आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला आहे. बांग्लादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज हे संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र साऊथ आफ्रिकेसाठी अंतिम फेरीची दारे खुली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत साऊथ आफ्रिका ५ व्या स्थानावर आहे.
सध्याचा सामना धरून साऊथ आफ्रिकेला एकूण ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. तर भारताने उर्वरित सामने जिंकले नाही किंवा सामने ड्रॉ झाले तर साऊथ आफ्रिकेला या स्पर्धेत चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण साऊथ आफ्रिका यापुढील चार सामने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. जर साऊथ आफ्रिकेने या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टेन्शन वाढणार आहे.
भारताचा दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज न्यूझीलंडने पुन्हा एकदा टीम इंडियाला जेरीस आणले. ३५९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला हे लक्ष्य पेलवले नाही. भारताचा अर्ध्यापेक्षा अधिक संघ पॅव्हेलिनमध्ये परतला. भारताच्या १८० धावांवर ७ विकेट गेल्या आहेत. न्यूझींलडने भारताचा ११३ धावांनी पराभव केला.
हेही वाचा: IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात या खेळाडूंचं होणार पत्ता कट
तिसऱ्या सामन्यात या खेळाडूंचा होणार पत्ता कट
रत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या तीन सामान्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. यामध्ये दोन्ही संघांमधील दोन सामने झाले आहेत. न्यूझीलंडने भारतात येऊन दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव केला आहे. अशाप्रकारे किवी संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता 1 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. WTC फायनलच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी हा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. भारताचा संघाने दोन्ही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्यांना दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे परिणाम त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या रँकिंगवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






