फोटो सौजन्य - BLACKCAPS
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या संघाने टीमची घोषणा केली आहे, त्याआधी न्यूझीलंडच्या संघ अडचणीत आला आहे. त्याआधी किवी संघाला एक-दोन नव्हे तर ४ मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. कर्णधारही या मालिकेतून बाहेर पडणार आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. पाठदुखीमुळे त्याने द हंड्रेडमधून परतण्याचा निर्णय घेतला होता.
वृत्तानुसार, आता त्याच्या पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे, त्यानंतर त्याला बरे होण्यासाठी किमान १ महिना लागू शकतो, अशा परिस्थितीत सँटनर या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होऊ शकतो, परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज विल्यम ओ’रोर्कला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो आता सुमारे ३ महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विल्यम ओ’रोर्कला स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रक्रियेतून जावे लागणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी लिहीले आहे की, स्कॅनमध्ये त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आल्यानंतर विल ओ’रोर्क किमान तीन महिने खेळू शकणार नाही. ग्लेन फिलिप्स आणि फिन अॅलन यांनाही चॅपेल-हॅडली मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे कारण ते त्यांची प्रकृती सुधारत आहेत, तर मिच सँटनरवर पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे परंतु तरीही तो मालिकेत स्थान मिळवण्याची आशा बाळगतो.
Injury Updates: Will O’Rourke will be out of action for at least three months after scans revealed a stress fracture in his lower back.
Glenn Phillips (groin injury) and Finn Allen (foot injury) have also been ruled out of the upcoming Chappell-Hadlee series as they continue to… pic.twitter.com/bs2rHjD7fh
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 25, 2025
याशिवाय ग्लेन फिलिप्स आणि फिन अॅलन हे देखील या टी-२० मालिकेतून बाहेर पडणार आहेत. ग्लेन फिलिप्सला कंबरेला दुखापत झाली आहे तर फिन अॅलनला त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना १ ऑक्टोबर रोजी बे ओव्हल येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-२० सामना ३ ऑक्टोबर रोजी ब्लेक पार्क येथे खेळला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना ४ ऑक्टोबर रोजी बे ओव्हल येथे खेळला जाईल.