Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 Final मध्ये भारताच्या संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी! न्यूझीलंडची नजर पहिल्या ट्रॉफीवर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करेल. भारताच्या संघाने फायनलच्या सामन्यामध्ये बाजी मारली तर संघाला अनेक रेकाॅर्ड नावावर करण्याची संधी आहे, यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 07, 2026 | 11:35 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

 २०२६ च्या टी-२० विश्वचषक फायनलच्या सामन्याला काही तास शिल्लक राहिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हा फायनलचा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे.  २०२६ च्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघ एक-दोन नव्हे तर तीन वेळा इतिहास रचू शकतो. दरम्यान, न्यूझीलंड संघाची नजर पहिल्या ट्रॉफीवर असेल. स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल आणि टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची टीम इंडियाला संधी

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करेल. जर टीम इंडियाने विजेतेपद जिंकले तर ते तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनेल. भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता. मागील 2 वर्षामध्ये भारताच्या संघाने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. 

Team India have had the upper hand against the Kiwis. 💪🏻🔥 Will the momentum continue in the big final? 👀 ICC Men’s #T20WorldCup 👉 FINAL | #INDvNZ | SUN, 8th MAR, 5:30 PM pic.twitter.com/BSRYwuBG0O — Star Sports (@StarSportsIndia) March 7, 2026

आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोनदा विजेतेपद जिंकले आहे. २०२१ मध्ये किवीज संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंग केले. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधीही किवीज संघाकडे आहे.

Ind Vs NZ : विश्वविजेत्याला संघावर होणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या T20 विश्वचषकात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार?

भारत आणखी दोन इतिहास रचू शकतो

  • एवढेच नाही तर टीम इंडियाला सलग दोन ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
  • आतापर्यंत कोणत्याही संघाला टी-२० विश्वचषकात जेतेपद राखता आलेले नाही.
  • आतापर्यंत कोणत्याही यजमान संघाने हे विजेतेपद जिंकलेले नाही.
  • २०२६ चा टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहेत.
  • श्रीलंकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
वर्ष विजेता उपविजेता होस्ट
2007 T20 विश्वचषक भारत पाकिस्तान दक्षिण आफ्रिका
2009 T20 विश्वचषक पाकिस्तान श्रीलंका इंग्लंड
2010 T20 विश्वचषक इंग्लंड ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज
2012 T20 विश्वचषक वेस्ट इंडिज श्रीलंका श्रीलंका
2014 T20 विश्वचषक श्रीलंका भारत बांग्लादेश
2016 T20 विश्वचषक वेस्ट इंडिज इंग्लंड भारत
2021 T20 विश्वचषक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यूएई आणि ओमान
2022 T20 विश्वचषक इंग्लंड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया
2024 T20 विश्वचषक भारत दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि वेस्ट इंडिज

Web Title: A golden opportunity for the indian team to create history in the t20 world cup 2026 fina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम
1

Keval Chaudhary Swimmer: 81 KMचा थरारक जलप्रवास! नदीचा प्रवाह अन् शारीरिक थकव्यावर मात करत केवल चौधरीचा नवा विक्रम

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
2

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.