Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs AFG : आशिया कपपुर्वी अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! अंतिम सामन्यात पाकिस्तानने तोडले लचके.. 

आशिया कपपूर्वी तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला आहे. या परभवासह अफगाणिस्तान संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 08, 2025 | 04:14 PM
PAK vs AFG: Afghanistan's embarrassing performance before the Asia Cup! Pakistan broke the resistance in the final match..

PAK vs AFG: Afghanistan's embarrassing performance before the Asia Cup! Pakistan broke the resistance in the final match..

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs AFG : आशिया कप २०२५ पूर्वी अफगाणिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला. टी-२० च्या तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने विजय मिळवत आपल्या चाहत्यांना आशिया कपपूर्वी आनंदवार्ता दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या विजयाचा अष्टपैलू मोहम्मद नवाज हीरो ठरला आहे.  त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने आपली शानदार कामगिरी करत पाकिस्तानला सामना जिंकून दिला. त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यातील पराभवानंतर अफगाणिस्तानवर मात्र मोठी नामुष्की ओढवली आहे.

हेही वाचा : अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा

अफगाणिस्तानच्या नावावर लज्जास्पद विक्रम

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध १४१ धावांचे टार्गेट दिले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाण संघ १५.५ षटकांत फक्त सर्वबाद ६६ धावाच करू शकला.  या कामगिरीने अफगाणिस्तान संघाने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.  टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या अंतिम सामन्यात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. या विक्रमात आता अफगाणिस्तान संघाने नॉर्वेजियन क्रिकेट संघाला  देखील पिछाडीवर टाकले. २०२४ मध्ये नॉर्वेने जर्सीविरुद्ध ६९ धावा उभारल्या होत्या. तर, २०१७ मध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध ७१ धावा काढल्या होत्या.

सामन्याची स्थिती

तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने सामन्यापूर्वी  नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानविरुद्ध १४१ धावा उभारल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार आघाने २४ आणि मोहम्मद नवाजने २५ धावा काढल्या होत्या. पाकिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ १५.५ षटकांत केवळ सर्वबाद ६६ धावाच करू शकला. त्यानुसार, पाकिस्तानने सामना ७५ धावांनी आपल्या खिशात टाकला.

हेही वाचा :PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान..

मोहम्मद नवाजची सामन्यात ऐतिहासिक हॅटट्रिक

पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू महम्मद नवाजने या सामन्यात इंटईहासिक कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन गडी माघारी पाठवले. त्यानंतर, मोहम्मद नवाजने सामन्याचा आठवा षटक टाकला आणि  या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने इब्राहिम झद्रानची विकेट घेऊन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. यासह, नवाज पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला असा पराक्रम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करता आलेली नाही.

Web Title: Pak vs afg afghanistans embarrassing performance before asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Afghanistan vs pakistan
  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!
1

BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!

IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
2

IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…
3

कर्णधार सूर्यकुमार यादव शुभमन गिलचा T20 आशिया कप 2025 संघात समावेश करण्यास केला विरोध, पण…

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार
4

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.