कार्लोस अल्काराझ(फोटो-सोशल मीडिया)
Carlos Alcaraz named winner of US Open 2025 : कार्लोस अल्काराझने आपले दुसरे यूएस ओपन २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. जेतेपदाच्या सामन्यामध्ये अल्काराझने दमदार खेळ दाखवला आणि जॅनिक सिनरला पराभूत केले. या विजयानंतर कार्लोस अल्काराझने एटीपी रँकिंगमध्ये नंबर १ स्थान पटकावले. या विजयानंतर कार्लोस अल्काराझचे प्रशिक्षकांनी त्याच्या विजयाची गुरुकिल्ली काय आहे याबाबत खुलासा केला.
कार्लोस अल्काराझचे प्रशिक्षक जुआन कार्लोस फेरेरा यांनी मोठा खुलासा केला. ते म्हटले की, १५ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराने अल्काराझच्या सिनरवरच्या विजयात महत्त्वाची भूमिका वठवली आहे. यूएस ओपनच्या अंतिम फेरमध्ये, अल्काराझने जॅनिक सिनरचा चार सेटमध्ये ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा दणदणीत पराभव केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वी, विम्बल्डनच्या अंतिम फेरीमध्ये अल्काराझला सिनरकडून पराभव पत्करावा लागला होता. प्रशिक्षक फरेरा यांच्या मते, अल्काराझकडे विचार करण्यासारखे बरेच काही उपलब्ध होते. त्याने नेमके त्यावेळी तेच केले.
प्रशिक्षक फरेरा म्हणाले की, “मला वाटत की ते खूप जास्त महत्वाचे होते, कारण आम्ही तब्बल १५ दिवस सराव करून जानिकविरुद्ध खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या बारकाव्यांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. आम्हाला माहित आहे की हार्ड कोर्टवर जानिकसोबत खेळणे नेहमीच खूप कठीण राहिले आहे. तो अनेक सामने जिंकत आला आहे. अल्काराझला कळले की त्याला काय सुधार करण्याची गरज आहे. . मी यावर खूप लक्ष केंद्रित केले होते.”
प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत असताना अल्काराझने चमकदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन केले. यासह, अल्काराझ सहा प्रमुख पदके जिंकणारा इतिहासातील सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरला आहे. कार्लोस अल्काराझने सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्या वेळेस एटीपी रँकिंगच्या शीर्षस्थानी विजयी पुनरागमन करण्यात यश मिळवले. अल्काराझ सोमवारी त्याच्या नंबर १ स्थानावरुण त्याचा ३७ वा आठवडा सुरू करणार आहे.
फेरेरा पुढे म्हणाले, “मला वाटते की आमच्याकडून सामन्यासाठी उत्तम तयारी करण्यात आली होती, काही सामने पाहिले आणि त्यातील बारकावे समजून घेण्यात आले. कार्लोसकडून त्याचे १००% देण्यात आले. हे म्हणणे सोपे आहे, मात्र करणे खूपच कठीण आहे. आजची त्याची कामगिरी खूपच शानदार राहली होती. मला वाटते की तो नेहमीच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःशी तडजोड करत आला. तसेच प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला. मला वाटते की ही एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे.”