
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. या मालिकेचा पहिला विजय पाकिस्तानच्या नावावर झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम येथे हा सामना खेळवण्यात आला. मालिकेतील पहिला सामना २९ जानेवारी रोजी खेळवण्यात आला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानने हा सामना २२ धावांनी जिंकला. या सामन्यात केकेआरचा २५.२ कोटींचा खेळाडू अपयशी ठरला.
केकेआरने आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात कॅमेरॉन ग्रीनला २५.२ कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले. आयपीएल २०२६ च्या आधी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणारा ग्रीन पहिल्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये कामगिरी करण्यात अपयशी ठरला. ग्रीनने ३१ चेंडूंचा सामना केला आणि ३ चौकार आणि १ षटकार मारत ३६ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ग्रीनला कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
ग्रीनने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला, जो त्याचा पहिला हंगाम होता, त्याने १६ सामन्यांमध्ये ४५२ धावा केल्या. २०२४ मध्ये त्याने आरसीबीकडून २५५ धावाही केल्या. आता तो आयपीएल २०२६ मध्ये केकेआरचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ९ बाद १६८ धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुबने ४० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. पाकिस्तानने २२ धावांनी विजय मिळवला.
अयुबनंतर कर्णधार आघा (३९) देखील जास्त काळ टिकू शकला नाही. झम्पाने त्याला १० व्या षटकात झेवियरकडे झेलबाद केले. त्यानंतर झम्पाने खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या बाबर आझमला एलबीडब्ल्यू बाद केले. बाबरने २० चेंडूत २४ धावांची संथ खेळी केली. बाबरच्या बाद झाल्यानंतर, इतर कोणताही फलंदाज लक्षणीय प्रभाव पाडू शकला नाही.
फखर झमानने १०, यष्टिरक्षक उस्मान खानने १८ आणि शादाब खानने १ धावा केल्या. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीलाही आपले खाते उघडता आले नाही. मोहम्मद नवाज १५ आणि सलमान मिर्झा ४ धावांवर नाबाद राहिले. अॅडम झम्पाने किफायतशीर गोलंदाजी करत ४ षटकांत २४ धावा देत ४ बळी घेतले. त्याच्याशिवाय, महली बियर्डमन आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.