Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs NAM, T20 World Cup : पाकिस्तानची एक्सप्रेस सुपर 8 मध्ये दाखल! टी-20 विश्वचषकात नामिबियाला 102 धावांनी चारली धूळ 

टी-२० विश्वचषक २०२६ च्या ३५ व्या सामन्यात पाकिस्तान संघाने नामिबियाला १०२ धावांनी हरवून सुपर ८ मध्ये स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानच्या विजयाने सुपर ८ मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांच्या नावांची यादी निश्चित झाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 07:36 PM
PAK vs NAM, T20 World Cup: Pakistan's Express enters Super 8! Namibia defeated by 102 runs in T20 World Cup

PAK vs NAM, T20 World Cup: Pakistan's Express enters Super 8! Namibia defeated by 102 runs in T20 World Cup

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs NAM, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ३५ व्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाला १०२ धावांनी पराभूत करत सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले आहे. यासह, सुपर ८ मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांच्या नावांची यादी आता  निश्चित झाली आहे. पाकिस्तानसाठी करो या मरो असलेल्या या सामन्यात, पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत  २० षटकांत ३ गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या. साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकाने पाकिस्तानचा विजय सोपं केला.

हेही वाचा : PAK vs NAM, T20 World Cup : चौकार-षटकरांची आतिषबाजी करत साहिबजादाने 58 चेंडूत ठोकले शतक! टी20 विश्वचषकात केला मोठा कारनाम

प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहान आणि सैम अयुब हे दोन सलामीवीर पाकिस्तानला जलद सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरले. दोन्ही खेळाडूंनी ५.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी ४० धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सईम १२ चेंडूत दोन चौकारांसह १४ धावा काढून माघारी गेला. त्यानंतर सलमान आगा आणि साहिबजादा फरहान यांनी ४२ चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. त्यानंतर सलमान २३ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांसह ३८ धावा काढून माघारी गेला. संघाचा ११८ धावांवर तिसरी विकेट्स गेली. त्यानंतर साहिबजादा फरहानने शादाब खानसह ४० चेंडूत ८१ धावांची अखंड भागीदारी करून पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Pakistan seal the final #T20WorldCup Super 8 spot with a solid victory over Namibia 👊 📝: https://t.co/ig0UhhTcFP pic.twitter.com/XnqUAqOTvK — ICC (@ICC) February 18, 2026

साहिबजादा फरहानचे नाबाद शतक

साहिबजादा फरहान ५८ चेंडूत चार षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने नाबाद  १०० धावा केल्या.  टी२० विश्वचषकात शतक करणारा फरहान दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला असून हा कारनामा अहमद शहजादने आधी केला होता. शेवटी, शादाबने २२ चेंडूत तीन षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३६ धावा फटकावल्या.  नामिबियाकडून जॅक ब्रुसेलने ४८ धावांत २ बळी घेतले, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने १ बळी टिपला.

हेही वाचा : T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर

नामिबियाचा १०२ धावांनी दणदणीत पराभव

पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग(टी-२० विश्वचषक २०२६ )करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली नाही. नामिबिया संघाने  ४९ धावांवर आपल्या चार विकेट गमावल्या. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी नामिबियाला पुनरागमन करण्याची संधीची दिली नाही. नामिबियाचा संघ १७.३ षटकांत फक्त ९७ धावांवर गारद झाला. संघाकडून लॉरेन स्टीनकॅम्पने २३ धावांचे योगदान दिले, तर अलेक्झांडर वोल्शेंकने २० धावा करून बाद झाला. याशिवाय, इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात यश आले नाही. पाकिस्तानकडून उस्मान तारिकने ३.३ षटकांत १६ धावा मोजत ४ बळी टिपले, तर शादाब खानने ३ बळी घेतले. सलमान मिर्झा आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी १ बळी घेतला आहे.

Web Title: Pak vs nam t20 world cup pakistan defeats namibia by 102 runs to enter super 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.