Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak vs Sa 2nd Test Match : केशव महाराजपुढे पाकिस्तानने टेकवले गुडघे! यजमान संघ 333 धावांवर गारद 

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डॉन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तान ३३३ धावांवर गारद झाला आहे. रावळपिंडी येथे हा सामना खेळला जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 21, 2025 | 05:09 PM
Pak vs Sa 2nd Test Match: Pakistan bows down before Keshav Maharaj! Hosts bowled out for 333 runs

Pak vs Sa 2nd Test Match: Pakistan bows down before Keshav Maharaj! Hosts bowled out for 333 runs

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan vs South Africa 2nd Test Match :  पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात दूसरा सामना खेळला जात आहे. रावळपिंडी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान ३३३ धावांवर गदगडला आहे. संघाची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीतील फलंदाज मैदानावर तग धरू शकले नाहीत. सलामीवीर अब्दुल्ला शफीक, कर्णधार शान मसूद आणि सौद शकील यांनी शानदार अर्धशतके झळकावून संघाला चांगल्या स्थितीकडे पोहचवले, परंतु उर्वरित फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. विरोधी गोलंदाजांनी अचूक लाईन आणि लेंथसह शानदार कामगिरी केली.  खालच्या फळीतील फलंदाज देखील प्रभाव पाडू शकले नाहीत आणि संघ ३३३ धावांवर गारद झाला.

हेही वाचा : खेळाडूंमध्ये इस्लामिक संस्कृतीचा प्रचार भोवला? कर्णधारपदावरून Rizwan च्या हकालपट्टीचे ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण…

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान संघाला इमाम-उल-हक (१७) ३५ धावांवरच बाद झाल्याने मोठा धक्का बसला. त्यानंतर अब्दुल्ला शफीकने कर्णधार मसूदसह दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरण्यास मदत केली.

शफीक १४६ चेंडूचा सामना करत ५७ धावांवर बाद झाला, त्याने यामध्ये चार चौकार मारले. त्यानंतर बाबर आझम (१६) बाद झाला. पाकिस्तानची तिसरी विकेट १६७ धावांवर गेली. त्यानंतर, कर्णधार मसूदने सौद शकीलसह चौथ्या विकेटसाठी ४५ धावा जोडून संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिली.मसूद १७६ चेंडूत ८७ धावा करून तो बाद झाला.

पाकिस्तानने २४६ धावांवर मोहम्मद रिझवानचा महत्वाचा गडी गमावला. त्यानंतर, सलमान आघा आणि सौद शकील यांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावा जोडून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यास हातभार लावला. आघा ४५ धावांवर बाद माघारी गेला, तर शकीलने ६६ धावा काढल्या.

केशव महाराजची जादुई गोलंदाजी

फिरकी गोलंदाज केशव महाराजने पाकिस्तानच्या डावात ४२.४ षटके टाकली आणि १०२ धावा देत ७ बळी घेण्याची किमया साधली. सायमन हार्मरनेही दोन बळी टिपले आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने उर्वरित एक बळी घेतला.

हेही वाचा : IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९३ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. यजमान संघ हा सामना जिंकून २-० असा क्लीन स्वीप पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेऊन आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्याचे लक्ष्य असणार आहे.

Web Title: Pak vs sa 2nd test match keshav maharaj took 7 wickets to restrict pakistan to 333 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Keshav Maharaj
  • Pakistan vs South Africa
  • Test Match

संबंधित बातम्या

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद
1

PCB ची मोठी कारवाई! पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला, मोहम्मद रिझवानकडून काढून घेतले कर्णधारपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.