पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
नक्वी यांनी ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात ठेवली आहे. सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की बीसीसीआयने नक्वी यांना नवीन इशारा दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्रॉफी भारतात परत करावी अन्यथा पुढील महिन्यात आयसीसीच्या बैठकीत हा विषय मांडला जाऊ शकतो.
हेही वाचा : IND vs AUS : गिल आर्मी अॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एसीसीच्या बैठकीत, बीसीसीआयने नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आला आणि सांगितले की आशिया कप एसीसीचा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले की आशिया कप २०२५ ट्रॉफी अधिकृतपणे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला सोपवण्यात यावी आणि ती त्वरित आशियाई क्रिकेट परिषदेला देण्यात यावी.
तत्पूर्वी, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एसीसी अध्यक्षांच्या कृतींवर कठोर टीका केली आणि त्यांच्या कृतीला चुकीचे म्हटले. सैकिया म्हणाले की, “आम्ही एसीसी अध्यक्षांकडून आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नसून जे एक वरिष्ठ पाकिस्तानी नेते आहेत. ही एक जाणूनबुजून केलेली रणनीती होती.” ते पुढे असे देखील म्हणाले की, “हे त्यांना ट्रॉफी आणि पदके सोबत नेण्याचा अधिकार देत नाही. हे अत्यंत दुर्दैवी असून खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत करण्यात येतील.”
अशी माहिती आहे की, बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये दुबई येथे होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत आशिया कप ट्रॉफीबाबत मुद्दा उपस्थित करण्यास तयार आहे. भारतीय बोर्ड एसीसी अध्यक्षांच्या वर्तनाविरुद्ध औपचारिक आणि तीव्र निषेध नोंदवण्याच्या विचारात आहे.






