सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत काल पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने 33 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळं पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला दिलेलं १८५ धावाचं टार्गेट १४२ करण्यात आलं आणि ओव्हर्सची संख्या १४ करण्यात आली होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ १०८ धावाच करु शकला. सामन्यात पाकिस्तानच्या शादाब खान आणि इफ्तिकार अहमदनं फलंदाजी करताना अर्धशतकं झळकावली असून गोलंदाजीत शादाब बरोबर शाहीन आफ्रिदी आणि इतर गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत पाकिस्तान संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानची स्टार जोडी रिझवान आणि बाबर आझम अनुक्रमे ४ आणि ६ रन करुन बाद झाले. मोहम्मद हॅरीसने २८ आणि शान मसूदने २ रन केल्यानंतर तोही बाद झाला. ज्यानंतर शादाब खान (५२) आणि इफ्तिकार अहमदनं (५१) दमदार अशी अर्धशतकं झळकावली. या दोघांच्या फटकेबाजीमुळेच पाकिस्ताननं १८५ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेला १८६ धावांच आव्हान दिल.
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा संयमी खेळी करत होता. पण डी कॉक एकही धाव न करता तंबूत परतल्यामुळे पाकिस्ताननं आघाडी घेतली होती. पाकिस्तानचे गोलंदाज अतिशय भेदक गोलंदाजी करत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एक-एक करुन बाद होत होते. ९ ओव्हर झाल्यावर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेनं ६९ रन केले होते आणि त्यांचे 4 गडी बाद झाले होते. मग पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर १४२ रनचं टार्गेट ठेवण्यात आलं आणि ओव्हर्सची संख्या 14 करण्यात आली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर कमी षटकांत मोठं लक्ष्य असल्यामुळे अखेर ३३ धावांनी ते पराभूत झाले.