Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026: मंगळवारी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने 'ग्रुप बी'मधून श्रीलंका आणि झिम्बाब्वेने पुढील फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सुपर ८ चे वेळापत्रक समोर आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 07:15 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर (Photo Credit- X)

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर!
  • भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर
  • ‘या’ संघांशी होणार लढत
Team India Super 8 Schedule: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ (ICC T20 World Cup 2026) मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. साखळी फेरीतील महत्त्वाचे सामने पूर्ण झाले असून ‘सुपर-८’ फेरीचे समीकरण आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने ‘ग्रुप बी’मधून श्रीलंका आणि झिम्बाब्वेने पुढील फेरीत प्रवेश केला आहे. या अनपेक्षित निकालामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, भारतीय संघाचे (Team India) आगामी प्रतिस्पर्धी आता निश्चित झाले आहेत.

टीम इंडियाचे ‘सुपर-८’ मधील आव्हान

साखळी फेरीत सलग तीन विजय मिळवून भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. सुपर-८ फेरीमध्ये भारताचा समावेश अत्यंत आव्हानात्मक गटात झाला असून टीम इंडियाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

सामना प्रतिस्पर्धी तारीख ठिकाण
सामना १ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २२ फेब्रुवारी अहमदाबाद
सामना २ भारत विरुद्ध झिम्बाब्वे २६ फेब्रुवारी चेन्नई
सामना ३ भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ०१ मार्च कोलकाता

Here is India’s Super 8 schedule in the T20 World Cup 2026. 🇮🇳 Can they qualify for the semifinals? 👀#Cricket #T20WC #India pic.twitter.com/StpJakHJW3 — Sportskeeda (@Sportskeeda) February 17, 2026

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

सीडिंग आणि गुणतालिकेचे समीकरण

सुपर-८ फेरीसाठी आयसीसीने आठ संघांची विभागणी प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात केली आहे. विशेष म्हणजे, या फेरीसाठी ‘प्री-सीडिंग’ (Pre-seeding) पद्धत वापरण्यात आली होती. या नियमानुसार, एखादा नामांकित संघ सुपर-८ मध्ये पोहोचू शकला नाही, तर जो संघ पात्र ठरेल तो बाद झालेल्या संघाची जागा घेईल. ऑस्ट्रेलियाचा संघ बाद झाल्यामुळे झिम्बाब्वेने आता त्यांची ‘X-2’ ही जागा घेतली आहे. यामुळे भारतीय गटातील समीकरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

भारताची आतापर्यंतची विजयी घोडदौड

कर्णधार सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता वर्चस्व राखले आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा पराभव केला, त्यानंतर नामिबियावर मात केली. विशेष म्हणजे, रविवारी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारताने दिमाखात अव्वल स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियाचा १७ वर्षांनंतर ऐतिहासिक फजितवा

या विश्वचषकातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतून बाहेर पडणे. तब्बल १७ वर्षांनंतर कांगारूंचा संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडला आहे. यापूर्वी २००९ मध्ये त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली होती. २०२६ च्या या स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून सर्वांना चकित केले, तर सोमवारी श्रीलंकेनेही त्यांचा पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला केवळ स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवता आला, ज्यामुळे त्यांच्या पदरी केवळ दोनच गुण पडले.

T20 WC 2026 : भारताकडून झालेल्या पराभवानंतर PCB चे अध्यक्ष Mohsin Naqvi संतापले, संघाला दिला हा कडक संदेश

Web Title: Australia out of t20 world cup 2026 indias super 8 schedule revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Australia
  • cricket news
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा
1

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
2

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!
3

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!

स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण
4

स्वतः बुडलेच पण ‘या’ संघांनाही बुडवणार? Mumbai Indians प्ले ऑफमध्ये कोणाचा खेळ संपवणार? पहा समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.