फोटो सौजन्य - BLACKCAPS/ Pakistan Cricket सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड : पाकिस्तान जवळजवळ तीन दशकांनंतर पहिल्यांदाच मोठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक आयसीसी स्पर्धांचे आयोजन गमावलेल्या पाकिस्तानसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. पण ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे, भारताचा संघ सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानला जाणार नाही त्यामुळे भारताचा संघ त्यांचे सर्व सामने युएईमध्ये खेळवणार आहे. आयोजित करण्यात आले चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील.
या स्पर्धेत अव्वल आठ एकदिवसीय संघ सहभागी होत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या आवृत्तीत, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने हायब्रिड मॉडेलची विनंती केली होती, ज्याला आयसीसीने सहमती दर्शवली होती. तथापि, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि म्हणूनच त्यांना पहिला सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
MI vs GG : WPL 2025 मध्ये हरमनप्रीत कौरचा संघ पहिल्या विजयाच्या शोधत, आज कमबॅक करण्याची सुवर्णसंधी
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना १९ फेब्रुवारी बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. यास सामन्याचे आयोजन नॅशनल स्टेडियम, कराची येथे करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुसरी २:३० वाजता सुरू होणार आहे. तर या सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच दुपारी २ वाजता नाणेफेक होईल.
भारतीय प्रेक्षक हा सामना टेलिव्हिजनवर पाहणारे चाहते पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क १८ चॅनेलवर पाहू शकतात. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे.
आठ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी परत येत आहे हे आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. अशा परिस्थितीत, सर्वांच्या नजरा यजमान पाकिस्तानवर असतील की ते स्पर्धेचे आयोजन कसे करेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कठीण स्पर्धा पाहण्याची अपेक्षा आहे.
मोहम्मद रिजवान (कर्णधार), फखर जमान, कामरान गुलाम, बाबर आझम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग आणि जेकब डफी.