सूर्यकुमार यादव आणि मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025 ind vs pak final : आशिया कप २०२५ (Asia Cup 2025 ) चा अंतिम सामन्यात भारताने पाकीस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतपद जिंकले. या विजयानंतर अनेळ घटना जय वादग्रस्त ठरल्या आहेत. भारतीय संघाने स्पर्धा जिंकली, परंतु भारतीय संघाने विजेत्याची ट्रॉफी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले.
सामन्यानंतर, भारतीय खेळाडूंकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्यात आला, कारण ती पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. भारतीय संघाकडून यूएई क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची मागणी केली होती. तथापि, नक्वी यांनी ही मागणी मान्य केली नाही.
हेही वाचा : IND vs SL : दीप्ती शर्माने रचला इतिहास! महिला विश्वचषकात ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय
विजयानंतर भारतीय खेळाडू एक तास मैदानावर वाट बघत बसले होते, परंतु जेव्हा त्यांच्या अटी मान्य करण्यात आल्या नाहीत, तेव्हा ते ट्रॉफीशिवाय माघारी ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्यानंतर मोहसिन नक्वी ट्रॉफी त्यांच्या ताब्यात घेऊन गेले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कृतीचा निषेध केला आणि ट्रॉफी भारताला सादर करण्यात यावी अशी कडक भूमिका करावी असे स्पष्ट केले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून देखील एसीसीच्या बैठकीत ट्रॉफीबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. नक्वी यांनी स्पष्ट केले की, जर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी हवी असेल तर त्याने ती एसीसी कार्यालयात वैयक्तिकरित्या येऊन घ्यावी.
मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला आहे. परंतु, आता भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक जुना फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आशिया कप पत्रकार परिषदेदरम्यान, सूर्यकुमार यादवनकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…
स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत हस्तांदोलन करण्यात आले तेव्हा जिथे सर्व संघांचे कर्णधार हजर होते. त्यानंतरच भारतीय संघ व्यवस्थापनाकडून निर्णय घेतला की भारतीय संघ पाकिस्तानशी हस्तांदोलन करू नये. आशिया कप दरम्यान खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन केले नाही.
आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर, काही लोक सोशल मीडियावर आता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रोल करण्यात येत आहे. ते म्हणत आहेत की जर सूर्याने आधी हस्तांदोलन केले तर तो नंतर ट्रॉफी का स्वीकारू शकला नाही? ट्रॉफी स्वीकारण्याचा किंवा न स्वीकारण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाकडून घेण्यात आला होता. तथापि, सूर्यकुमार यादवचा हस्तांदोलन करण्याचा निर्णय हा वैयक्तिक होता, कारण व्यवस्थापनाने त्यावेळी असे काही देखील सांगितले नव्हते.