दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Deepti Sharma created history : मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात, श्रीलंका आणि भारत आमनेसामने आले होते. या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने एक मलोटही कामगिरी केली आहे. महिला विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकावून आणि तीन विकेट्स घेत, दीप्ती शर्माने इतिहासाला गवसणी घातली आहे. विश्वचषकात हा पराक्रम करणारी दीप्ती शर्मा भारतीय महिला संघाची पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.
मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी, खेळवण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने विश्वचषकाची श्रीलंकेचा पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. दीप्ती शर्माने फलंदाजी करत ५३ धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत.सामन्यातील या उत्कृष्ट कामगिरीसाठी दीप्तीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा : IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात, भारतीय संघासाठी तीन खेळाडूंनी एकाच सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि किमान तीन विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज या तिघांनीही भारतासाठी हा पराक्रम करून दाखवला आहे. तथापि, दीप्ती शर्मा ही एकमेव भारतीय खेळाडू आहे जिने दोनदा ही कामगिरी करण्याची किमया साधली आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, दीप्ती शर्माने १० षटके गोलंदाजी केली आणि ५४ धावा मोजून ३ विकेट्स घेतल्या. १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेची कर्णधार जी घातक ठरत होती अशा चामारी अटापट्टूला बाद करून तिने आपला पहिला बळी मिळवण्यात यश मिळवले. दीप्तीने कविशा दिलहारीला आपला दूसरा बळी ठरवले आणि अनुष्का संजीवनीला बाद करून शर्माने तिसरा बळी पूर्ण केला.
हेही वाचा : मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर
दीप्ती शर्माने भारताकडून फलंदाजी करताना ५३ चेंडूत शानदार ५३ धावा केल्या. तिने अमनजोत कौरसोबत सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी देखील केली. अमनजोत कौरने ५६ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माला अचिनी कुलसुरियाने माघारी पाठवले.