फोटो सौजन्य - Pakistan Cricket
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच कसोटी मालिका संपली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने स्वतःच्या घराच्या मैदानावर दमदार कामगिरी करून इंग्लंडला शेवटच्या सामन्यात पराभूत करून ३ वर्षानंतर कसोटी मालिका नावावर केली आहे. पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये २-१ ने मालिका जिंकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट संघाचे कौतुक केले जात आहे. २०२१ नंतर पाकिस्तानचा घरच्या कसोटी मालिकेतील हा पहिला विजय ठरला. पाकिस्तानच्या संघाने हा विजय संघाचा नवा कर्णधार सान मसूदच्या नेतृत्वाखाली मिळवला आहे.
पाकिस्तानच्या संघाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी नंतर दमदार कमबॅक करत सलग दोन्ही सामने जिंकले. पाकिस्तानच्या संघामधून साजिद खान आणि नोमान अली यांनी या सामन्यात संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. पाकिस्तान इंग्लंड सामन्यात साजिदने १० आणि नोमान अलीने ९ विकेट घेतल्या. पहिल्या डावात साजिद खानने फलंदाजी करताना ६ बळी घेतले आणि ४८ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात साजिदने ४ बळी घेतले. याशिवाय नोमान अलीने पहिल्या डावात 3 बळी घेतले आणि फलंदाजी करताना ४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात नोमानने ६ विकेट घेतल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या सर्व २० विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पुढच्या दोन कसोटी जिंकून पाकिस्तानने मालिका जिंकली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बाबर या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा एक भाग होता, ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये बाबर पाकिस्तानचा भाग नव्हता आणि संघ जिंकला.
Pakistan win the series 2️⃣-1️⃣ ✅#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/JKhdUHNUk7
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 26, 2024
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात २६७/१० धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४/१० धावा केल्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव केवळ ११२ धावांत गडगडला आणि इंग्लिश संघाने पाकिस्तानसमोर केवळ ३६ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने ३.१ षटकात ३७/१ धावा करून विजय मिळवला. अशा प्रकारे पाकिस्तानने प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या भूमीवर विजयाची चव चाखली. पाकिस्तानच्या संघाची मागील काही वर्षांपासून संघाने सतत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे नक्कीच या विजयाने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. तर यावेळी विजय मिळवून आपले स्थान राखून ठेवण्याची कामगिरी भारत करेल अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.
हेदेखील वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शामीच्या करिअरवर पूर्णविराम? बीसीसीआयने घेतला निर्णय