
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Royal Challengers Bengaluru W vs UP Warriorz W Match Preview : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कठीण परीक्षेचा सामना केल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोमवारी महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये स्टार स्टडर्ड यूपी वॉरियर्सविरुद्ध आपला लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाची या नव्या सिझनमध्ये विजयी सुरूवात झाली आहे. तर यूपी वॉरियर्सच्या हाती पहिल्या सामन्यामध्ये निराशा लागली आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या विजेत्या संघाने शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन विकेट्सनी विजय मिळवत कठीण परिस्थितीतून सावरले. दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू नदिन डी क्लार्कने शेवटच्या चार चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले. तर दुसरीकडे यूपी वॉरियर्स या सिझनमध्ये त्याच्या नव्या कर्णधारासह मैदानामध्ये उतरली पण त्यांना त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज दोन्ही संघाचा दुसरा सामना या सिझनचा असणार आहे.
आरसीबीच्या विजयाने मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला धक्का बसला. मानधना आणि आरसीबीसाठी हा एक खास क्षण होता आणि संघाला यूपी वॉरियर्सविरुद्ध डी क्लार्क (नाबाद ६३ आणि चार बळी) कडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मागील सामन्यात डी क्लार्क व्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली होती, त्यामुळे मानधना तिच्या आणि टॉप-ऑर्डर फलंदाजांनी योगदान द्यावे अशी अपेक्षा करेल.
RCB will lock horns with UP Warriorz in match 5️⃣ of the WPL 2026 in Navi Mumbai 🏏 Who will come out on top tonight? 🤔#RCBvUPW #WPL2026 #CricketTwitter pic.twitter.com/e4pGa9d6LI — InsideSport (@InsideSportIND) January 12, 2026
आरसीबी : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, ग्रेस हॅरिस, राधा यादव, नदिन डी क्लर्क, जॉर्जिया वॉल, लिन्से स्मिथ, प्रेथा कुमार, प्रेता कुमार, हेमातामी प्रत्युषा.
यूपी वॉरियर्स: मेग लॅनिंग (कर्णधार), दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टन, फोबी लिचफिल्ड, शिखा पांडे, आशा शोबाना, डिआंड्रा डॉटिन, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, प्रतिका रावल, क्लो ट्रायॉन, जी त्रिशा, शिप्रा गिरी (विकेट, श्रेयना, श्वेरता, श्वरेना, श्वेतके) आणि तारा नॉरिस.