Champion Trophy 2025: Team India's victory leaves Pakistan in mourning; 'The winner is already decided'; Afridi's fiery...
Champion Trophy 2025 : टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताच्या विजयाने सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानला चांगलीच मिर्चि झोंबलेली दिसत आहे. 29 वर्षांनंतर पाकिस्तानला ICC टूर्नामेंटचे यजमानपद मिळाले आहे. पण, पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच गारद झाला होता. त्यानंतर पाकिस्तानी लोकांनी भारतावर तोंडसुख घ्यायला सुरवात केली आहे. त्यात माजी दिग्गज पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचाही समावेश आहे. त्याने भारताच्या विजयावर आगपाखड सुरू केली आहे.
हेही वाचा : चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर फडणवीसांनी रोहित-विराटसोबत आणखी एका क्रिकेटरचं केले विशेष कौतुक…
एकीकडे टीम इंडियाच्या विजयाचा भारतामध्ये दिवाळीसारखा जल्लोष सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये या विजयाने शोककळा पसरली असल्याचे दिसून आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसी विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. भारताच्या फायनलनंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला की ‘टीम इंडिया जिंकली नसती, तर मला आश्चर्य वाटले असते.’
एका मुलाखती दरम्यान शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ‘भारत ज्या पद्धतीने त्या एकाच मैदानावर खेळत होता. त्यांना सपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रवास करावा लागला नाही, सतत एकाच मैदानावर खेळून त्यांना खेळपट्टीची चांगली माहिती होती. त्यामुळे साहजिकच त्यांना विजय मिळाला आहे. टीम इंडिया जिंकली नसती तरच नवल.’ असेही आफ्रिदी म्हणाला.
हेही वाचा : चॅम्पियन झाल्यावर बायकोसमोरच रोहितचं केलं अनुष्काने मनापासून अभिनंदन, मारली घट्ट मिठी Video Viral
शाहिद आफ्रिदीने भारताला याच मैदानावर खेळण्याचे कसे फायदे मिळाले हे सांगितले. मात्र, त्यानंतर मात्र टो म्हणाला की, ही आधीच ठरले होते, त्यामुळे आता यावर बोलण्यात काय अर्थ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल आफ्रिदीने टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि म्हणाला, ‘टीम इंडियाला हे माहित होते की दुबईमध्ये फिरकीपटूंना मदत मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी त्या त्यानुसार एक चांगला संघ तयार केला.’
इतकेच नाही तर आफ्रिदीने पाकिस्तानची खिल्लीही उडवली आहे. तो म्हणाला की, ‘पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 4 फिरकीपटू खेळवायचे होते, तिथे त्यांना खेळवले नाही आणि आता ते न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 4 फिरकीपटू वापरत आहेत, जिथे त्याची काही गरज नाही. हे सांगताना त्याला हसू आवरता येत नव्हते.
भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.