फोटो सौजन्य - X/ICC सोशल मीडिया
Chief Minister Devendra Fadnavis reaction after the Indian team won : भारताच्या संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अपराजित राहिला. टीम इंडियाने एकही सामना न गमावता जेतेपद नावावर केले. न्यूझीलंडचा संघ क्रिकेट विश्वामधील एक मजबूत संघ आहे टीम इंडियाने या सामन्यांमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजय मिळवल्यानंतर विधानसभेमध्ये संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे त्याचबरोबर त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक खेळाडूंचे विशेष कौतुक त्यांनी केले आहे.
आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने प्रचंड मेहनत केली. त्याचबरोबर शेवटच्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने ज्याप्रकारे खेळ दाखवला आणि त्याने त्याचा खेळ बदलला. या खेळामध्ये त्याने मध्ये वेगाने तर कधी संथ असा खेळ खेळून पिचवर टिकून ७३ धावा त्यांनी काढल्या आणि या सामान्यांच्या निर्णायक धावा होत्या असे मुख्यमंत्री म्हणाले.
Maharashtra CM Devendra Fadanvis praised captain rohit sharmas innings and captaincy in the CT final 🔥#RohitSharma | #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/O5OlWB6r1d
— Yasho✧ (@Rho_dium45) March 10, 2025
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा विजय म्हणजेच असंख्य क्रिकेट प्रेमींना अविस्मरणीय अशाप्रकारची भेट दिली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सांघिक भावना पाहायला मिळाली. तर ते पुढे म्हणाले की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मबद्दल अनेकजण बोलत होते. फॉर्म हा टेम्पररी असतो क्लास हा पर्मनंट असतो हे या दोघांनी दाखवून दिले.
पुढे ते म्हणाले की, मला विशेष कौतुक करावेस वाटते ते म्हणजे वरुण चक्रवर्ती याचे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी ज्याप्रकारे कामगिरी केली आहे संघाला अडचणींमधून काढण्याचं काम या दोघांनी केलं. आणि कालच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चार फिरकीपटूनसह सामना खेळला. यावेळी काही युवा आणि काही अनुभवी खेळाडूचा असा भारताचा संघ होता.