
Dispute before marriage escalates! Shocking chat goes viral; Smriti's salary fraud by Palash Muchhal?
Smriti Mandhana and Palash Muchhal marriage controversy : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. या विषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या स्टार जोडप्याचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी होणार होते, हळदी आणि संगीत समारंभ देखील पार पडले होते. परंतु, लग्नाच्या फक्त एक दिवस आधी, स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि समारंभ पुढे ढकलण्यात आला. तथापि, खरा गोंधळ निर्माण झाला जेव्हा स्मृतीकडून अचानक तिच्या लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम
स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाने केवळ तिचे हळदी, संगीत आणि साखरपुड्याचे फोटो डिलीट केले नाहीत तर तिचा प्रपोजल व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावररून हटवण्यात आला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आणि अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. लग्न पुढे ढकलल्यानंतर इतक्या लवकर पोस्ट डिलीट केल्याने लोकांना या जोडप्यात काहीतरी बिनसले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, इंस्टाग्राम वापरकर्ता मेरी डि’कोस्टाकडून पलाश मुच्छलसोबतच्या तिच्या चॅटचे कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. यामुळे आता हा वाद आणखीच वाढला आहे. जरी नंतर अकाउंट निष्क्रिय करण्यात आले असले तरी, चॅट्स अजून देखील ऑनलाइन फिरत आहेत. स्क्रीनशॉट्समध्ये मे २०२५ चे मेसेज दाखवण्यात आले आहेत. ज्यामध्ये पलाश मेरीला पोहायला जाण्याचे आमंत्रण देत असल्याचे दिसत आहे.
Someone on Insta posted ss of Palash DMing her.
byu/itneverhelps inBollyBlindsNGossip
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम
जेव्हा मेरीकडून त्याला त्याच्या नात्याबद्दल आणि प्रेमाबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पलाश उत्तर देण्याचे टाळले आणि भेटण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. या संभाषणांमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेत पलाश मानधनाची फसवणूक करत आहे का. असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पलाश मुच्छलची बहीण, पलक मुच्छलकडून स्मृती मानधनाच्या वडिलांच्या आजारपणामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देणारी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी या संवेदनशील काळात दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन देखील जनतेला केले आहे. तथापि, स्मृती किंवा पलाश दोघांकडून देखील अद्याप व्हायरल चॅट्सबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.