Manu Bhaker qualified for the finals
Paris Olympic 2024 Indias Star Shooter Manu Bhaker : भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने तमाम भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत. 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय खेळाडूंनी नाराज केल्यानंतर आता 10 मीटर एअर पिस्टलमध्ये महिला खेळाडूंनी भारताचा गौरव वाढवला आहे. टीम इंडियाच्या वुम्न्स 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. मनू भाकर हिने 580 गुण मिळवत रॅंकींगमध्ये 3 रे स्थान गाठले आहे. त्यानंतर सांगवान रिथम हिने 573 गुणांसह 15 व्या रॅंकवर उडी मारली.
भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर मेडल्सच्या आशा उंचावल्या आहेत.
10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय खेळाडूंची हुकली संधी
पहिल्यांदा भारताचा खेळाडू रोईंगमध्ये सामील झाला होता. यामध्ये बलराज पनवार चौथ्या स्थानावर राहिला. त्यामुळे तो थेट उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला नाही. परंतु आता १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये भारताच्या संघांकडून निराशा हाती आली आहे. यामध्ये भारताचे या स्पर्धेत सहभागी झालेले दोन्ही भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर आहेत. अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सातव्या स्थानावर आहे. तर इलावेनिल आणि संदीपची जोडी १२व्या स्थानावर आहे.
तब्बल 20 वर्षांनंतर फायनलला 10 मीटर एअर रायफलमध्ये पोहचलेली पहिली भारतीय नेमबाज
Fact Check: Manu Bhaker is now the 1st Indian female shooter to reach an Olympic Final in an individual event in the last 20 years!
The last time was Suma Shirur, who reached the Final of the 10m Air Rifle event in Athens 2004. https://t.co/qKzl0DS809
— India_AllSports (@India_AllSports) July 27, 2024
तब्बल 20 वर्षांनतर वाट्याला आले यश
भारतीय महिला खेळाडूंनी मिळवलेले हे यश तब्बल 20 वर्षांनंतर भारतीयाच्या वाट्याला आले आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने मेडल्साठी पुन्हा एकदा आशा उंचावल्या आहेत. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की, ही खेळाडू इंडियाला गोल्ड जिंकून देते की, ब्रांझवर समाधान मानावे लागते, तमाम भारतीयांच्या तिला शुभेच्छा आहेत.