भारताची बॅंडमिंटन स्टार पी व्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले शानदार प्रदर्शन कायम ठेवत सलग दोन विजय मिळविले आहेत. पी व्ही सिंधूने गटसाखळीतील दुसऱ्या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टीन कूबावर 21-5, 21-10 असा दमदार विजय मिळविला. या विजयासोबतच पी व्ही सिंधूने प्री क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. पी व्ही सिंधून पहिल्या सामन्यात मालदिवच्या बॅडमिंटनपटूला पराभूत केले होते.
सिंधूचा एकतर्फी विजय
गटसाखळीतील दुसऱ्या सामन्यात दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने क्रिस्टीन कूबावर सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले.या वर्चस्वामुळे कुबाने पहिल्या सेटमध्ये सिंधूसमोर सपशेल शरणागती पत्कारली आणि हा सेट सिंधूने 21-5 अशा मोठ्या अंतराने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने झंझावात कायम ठेवला तिच्या आक्रमक खेळावर कूबाकडे उत्तरच नव्हते. त्यामुळे दुसरा सेटही 21-10 असा जिंकत सिंधूने मोठा विजय मिळविला. सिंधूने हा सामना अवघ्या अर्ध्या तासात आपल्या नावावर केला. पहिल्या सामन्यामध्ये सिंधूने मालदिवच्या फातिमाथ नाबाविरुध्दही कमालीचा आक्रमक खेळ केला होता. या खेळाच्या जोरावर सिंधूने 21-9,21-6 असा जिंकत ऑलिम्पिक अभियानाची दमदार सुरुवात केली होती. हा सामना सिंधून केवळ 29 मिनिंटामध्ये जिंकला होता.
Group Winner. ✅ Place in Quarterfinal. ✅
Keep going Sindhu! 🇮🇳
📸: @badmintonphoto#Paris2024#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/bWSYdjIkH8
— BAI Media (@BAI_Media) July 31, 2024
सिंधू रचणार इतिहास
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्यपदक जिंकले. या सलग पदकविजयामुळे सिंधू भारताकडून दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती. या ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आपला शानदार फॉर्म कायम ठेवल्यास ती भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचू शकते. भारताकडून तीन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली खेळाडू बनू शकते ते ही सलग ऑलिम्पिकमध्ये. सिंधूने प्री क्वाटर फायनलपर्यंत धडक दिल्याने ती इतिहासाच्या अजून एक पाऊल जवळ आली आहे. सिंधूचा प्री क्वाटरचा सामना उद्या गुरुवारी होणार आहे.